Tulsi Vivah 2023 : तुळशीच्या लग्नाचा शुभ मुहूर्त, प्रथा अन् परंपरा काय आहेत?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

What are the auspicious times customs and traditions of Tulsi Vivah 2023 Know about it
What are the auspicious times customs and traditions of Tulsi Vivah 2023 Know about it
social share
google news

Tulsi Vivah Shubh Muhurta 2023 : हिंदू पंचांगानुसार, तुळशी विवाहाचा (Tulsi Vivah 2023) सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो. यंदा हा दिवस आज म्हणजेच शुक्रवारी 24 नोव्हेंबरला आला आहे. या दिवसाच्या आदल्या दिवशी देवउठाणी एकादशीचा उपवास केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी माता तुळशी आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह होतो. असं मानलं जातं की, तुळशीविवाहाच्या विधी जो व्यक्ती करतो त्याला तितकंच पुण्य मिळतं जितकं कन्यादानातून मिळतं. (What are the auspicious times customs and traditions of Tulsi Vivah 2023 Know about it)

ADVERTISEMENT

तुळशी विवाहाचा 2023 शुभ मुहूर्त कधी?

तुळशी विवाहाच्या आदल्या दिवशी द्वादशी तिथी 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 मिनिटांनी सुरू झाली ती आज (24 नोव्हेंबर) सायंकाळी ७.०६ वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 24 नोव्हेंबरला म्हणजेच आजच तुळशी विवाह होणार आहे.

वाचा : Deep fake : रश्मिका मंदानानंतर रतन टाटांचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल, व्हिडीओत काय?

तुळशी विवाह शुभ योग

आज तुळशी विवाहाचा एक मुहूर्त सकाळी 11:28 ते दुपारी 12:11 पर्यंत असेल आणि दुसरा मुहूर्त दुपारी 1:37 ते 2:20 पर्यंत असेल. याशिवाय आज सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगातही तुळशी विवाह केला जातो.

हे वाचलं का?

  • सर्वार्थ सिद्धी योग – दिवसभर चालेल
  • अमृत ​​सिद्धी योग- आज सकाळी 6.51 ते दुपारी 4.01 पर्यंत असेल.

वाचा : MLAs Disqualification Case : “ठाकरेंचा शिंदेंबद्दलचा ‘तो’ ठराव बनावट”

तुळशी विवाह पूजा विधी

एका खांबावर तुळशीचे रोप आणि दुसऱ्या खांबावर शालिग्राम स्थापित करा. त्यांच्या शेजारी पाण्याने भरलेला कलश ठेवा आणि त्यावर पाच आंब्याची पाने ठेवा. तुळशीच्या कुंडीला गेरू लावा आणि त्यात तुपाचा दिवा लावा. तुळशी आणि शालिग्रामवर गंगाजल शिंपडा आणि चंदनाचा टिका लावा. तुळशीच्या कुंडीतच उसाचा मंडप उभारा. आता तुळशीला लग्नाचे प्रतीक असलेल्या लाल चुनरीने झाकून टाका. कुंडीला साडी गुंडाळा, बांगड्या अर्पण करा आणि वधूप्रमाणे सजवा. यानंतर शालिग्राम हातात घेऊन तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घातली जाते. यानंतर आरती करावी. तुळशीविवाह संपल्यानंतर सर्व लोकांना प्रसाद वाटला जातो.

तुळशी विवाहाचे महत्व काय?

तुळशी विवाहाचे आयोजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती तुळशीचा विवाह भगवान विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामशी करतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्याला भगवान हरीची विशेष कृपा प्राप्त होते. तुळशीविवाह हे कन्यादानाइतकेच पुण्यपूर्ण मानले जाते. तुळशीविवाह करणार्‍यांना वैवाहिक सुख मिळते असे म्हणतात.

ADVERTISEMENT

वाचा : Crime : लग्नाच्या पहिल्याच रात्री घात, खिरीमध्ये गुंगीचे औषध मिसळून…लग्नघरात काय घडलं?

धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाहाचे लाभ कोणते?

  • तुळशी विवाहाच्या दिवशी जर तुम्ही थोडे दुधात केशर मिसळून तुळशीच्या मुळांमध्ये अर्पण केले तर धन वाढीचा मार्ग खुला होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल असे मानले जाते.
  • या दिवशी तुळशीच्या रोपाला श्रृंगाराचे सामान अर्पण करून पूजा करावी आणि पूजेनंतर सर्व वस्तू विवाहित स्त्रीला भेट द्याव्यात.

तुळशी विवाह नियम

  • धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीविवाहाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न सेवन करू नये. जसं की, कांदा किंवा लसूण…
  • तुळशी विवाहाच्या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचा वाद होऊ देऊ नये. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा.
  • तुळशी विवाहाच्या दिवशी खोटे बोलण्यापासून सावध रहावे आणि कोणाचाही अपमान करू नये.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT