'चल बेडरूममध्ये...' पत्नी रात्री एकत्र झोपायला दिला नकार, पतीने सगळ्या गावाला टाकलं हादरवून!

Wife Murder: पती-पत्नीत भांडण इतके वाढले की पतीने आपल्या पत्नीला मारहाण करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

even after 2 years of marriage there was no child when husband called his wife to sleep with him bedroom she refused then husband killed to wife
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

यादगीर (कर्नाटक): पती-पत्नीमध्ये भांडण होणं ही काही नवी बाब नाही. प्रत्येक जोडप्यामध्ये थोड्या फार प्रमाणात भांडणं ही होतातच परंतु कर्नाटकमधील यादगीर जिल्ह्यात घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे पत्नी बेडरूममध्ये झोपण्यासाठी न आल्याने पती प्रचंड संतापला आणि त्याने पत्नीशी भांडण सुरू केले. हा वाद एवढा वाढला की, ज्यामध्ये पत्नीला आपला हकनाक जीव गमवावा लागला. ही घटना हुनसागी तालुक्यातील बुडागुंपर दोड्डी गावात घडली आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

लग्नाला दोन वर्षानंतरही सतत सुरू होती भांडणं

21 वर्षीय अय्यम्मा आणि तिचा पती अमरेश गुडागुंती यांचे लग्न फक्त दोन वर्षांपूर्वी झाले होते. लग्न झाल्यापासून त्यांना आपल्याला मुल व्हावं अशी इच्छा होती. मात्र, आतापर्यंत त्यांना बाळ झालं नव्हतं. त्यामुळे पती-पत्नीत यावरून वारंवार वाद आणि भांडणे होत असत.

हे ही वाचा>> Viral VIDEO: मुलीला चपलेने मारहाण तर मुलीनेही मारल्या बापाला लाथा, कशामुळे झाला एवढा तुफान राडा?

रात्री बेडरूममध्ये एकत्र झोपण्यास दिला नकार, अन्..

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 11 ऑगस्टच्या रात्री अमरेशने त्याच्या पत्नीला बेडरूममध्ये त्याच्यासोबत झोपायला बोलावले. पण अय्यम्माने त्यासाठी नकार दिला. हा नकार अमरेशला अजिबात पचवता आला नाही. ज्यामुळे तो प्रचंड संतापला. यावेळी त्याने रागाच्या भरात पत्नी अय्यम्माला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अमरेश अत्यंत हिंस्त्र पद्धतीने अय्यम्माला मारहाण करत होता. ज्यामुळे अय्यम्मा ही गंभीर जखमी झाली. ज्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे ही वाचा>> तरुणीला पाहताच तरुणाला कंट्रोलच झालं नाही, त्यानं पँटची चैन काढली अन् भररस्त्यातच हस्तमैथुन...व्हिडिओ तुफान व्हायरल

पोलिसांनी केला खुलासा 

घटनेची माहिती मिळताच कोडेकाल पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि अहवालात ही हत्या असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी पतील अमरेश गुडागुंती याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे बुडागुंपर दोड्डी गावातील ग्रामस्थांना देखील मोठा धक्का बसला आहे. लग्नाच्या अवघ्या दोन वर्षात इतके मोठे पाऊल उचलल्याने गावात चिंता व्यक्त केली जात आहे. एका ग्रामस्थाने सांगितले की, "पती-पत्नीमध्ये भांडणे होतात, परंतु हे प्रकरण जीव घेण्यापर्यंत पोहोचेल असे कोणालाही वाटले नव्हते."

हे वाचलं का?

    follow whatsapp