TRF: 'मोदी को जाके बताओ...', असं म्हणत पर्यटकांना ठार मारणारे नराधम कोणत्या संघटनेचे?

मुंबई तक

The Resistance Front :  कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील मंजूनाथ यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

The Resistance Front History
The Resistance Front History
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या टीआरएफ संघटनेनं केलं टार्गेट किलिंग

point

दहशतवाद्यांची TRF संघटना आहे तरी काय? 

point

जाणून घ्या या संघटनेबाबत सविस्तर माहिती

The Resistance Front :  कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील मंजूनाथ यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला. पतीला डोळ्यांसमोरच गोळ्या झाडल्याने पत्नी पल्लवीच्या रडू कोसळलं. यावेळी पल्लवी दहशतवाद्यांना म्हणाली मला का सोडताय, मलाही मारून टाका..यावर दहशतवादी म्हणाले, महिलांना आणि मुलांना मारणार नाही.

जा मोदीला जाऊन सांग.. 22 एप्रिलच्या दुपारी पहलगामच्या बैसरन इथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी (TRF) म्हणजेच द रेजिस्टेंस फ्रंटने घेतली. ही TRF दहशतवादी संघटना नेमकी काय आहे? या संघटनेमागची स्टोरी काय? काश्मीरवर यापूर्वी कधी हल्ला झालाय? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

मिळालेल्या माहितीनुसार, पहलगामच्या बैसरनमध्ये दहशतवादी  पोलिसांच्या ड्रेसकोडमध्ये पोहोचले होते. या ठिकाणी पर्यटक हॉर्स राईडींग करत होते. अचानक हे दहशतवादी आले आणि त्यांनी फायरिंग सुरु केली. या हल्ल्यात अनेक निष्पाप जणांचा बळी गेला. दहशतववाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळया झाडल्या. द रेजिस्टेंस फ्रंट म्हणजेच TRF ने या हल्ल्याची जबाबदारी घेतलीय. 

दहशतवाद्यांची TRF संघटना आहे तरी काय? 

TRF ही गेल्या काही वर्षांपासून जम्मू आणि कश्मिरमध्ये सक्रिय असलेली दहशतवादी संघटना आहे. ही संघटना लष्कर ए तैयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघचनेची एक शाखा समजली जाते. पाकिस्तानमधये बसलेला शेख सज्जाद गुल या संघटनेचा प्रमुख. त्याच्याच इशाऱ्याने जम्मू काश्मीरवर सातत्यानं दहशतवादी हल्ले होतात. पाकिस्तानी सेना आणि आयएसटी TRF च्या मागून मदत करतं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp