Cyclone: 2 चक्रीवादळं कुठे धडकणार, ‘तेज’ चक्रीवादळ येणार मुंबईच्या दिशेने?

भाग्यश्री राऊत

2 Cyclone Update: अरबी समुद्रातलं चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने येण्याचा धोका आहे का? दोन्ही चक्रीवादळांचा भारतीय किनारपट्टीला किती धोका आहे? जाणून घ्या याविषयी सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

where 2 cyclones will hit tej cyclone will come towards mumbai maharashtra weather update
where 2 cyclones will hit tej cyclone will come towards mumbai maharashtra weather update
social share
google news

Mumbai Cyclone: मुंबई: मान्सून (Monsoon) संपला असतानाच आता दोन चक्रीवादळाचं (cyclone) संकट घोंगावतं आहे. अरबी समुद्रासोबत (Arabian Sea) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होतं आहे. दोन्ही चक्रीवादळं कोणत्या दिशेने जाणार? चक्रीवादळ नेमके कधी आणि कुठे धडकणार? अरबी समुद्रातलं चक्रीवादळ मुंबईच्या (Mumbai) दिशेने येण्याचा धोका आहे का? दोन्ही चक्रीवादळांचा भारतीय किनारपट्टीला किती धोका आहे? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (where 2 cyclones will hit tej cyclone will come towards mumbai maharashtra weather update)

‘तेज’ चक्रीवादळ वेगाने सरकतंय पुढे…

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबरला अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप परिसरात चक्राकार वारे तयार झाले आहेत. 18 ऑक्टोबरला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून 21 ऑक्टोबरला दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हे मान्सूननंतरचं पहिलं चक्रीवादळ असून आता ते ‘तेज’ नावाने ओळखलं जाईल. सध्या हे चक्रीवादळ 30-40 किमी प्रतितास वेगानं पुढे सरकतं आहे.

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील ‘तेज’ या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला कुठलाही धोका नाही. तेज चक्रीवादळ 21 ऑक्टोबरला मध्य अरबी समुद्रात तयार झाल्यानंतर पुढील काही तासांत अधिक तीव्र होईल. त्यानंतर हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेला सरकत जाऊन ओमान ते येमेनच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा>> Cyclone: 2 चक्रीवादळांचं संकट घोंगावतंय, मुंबईसह महाराष्ट्राला किती धोका?

‘तेज’ चक्रीवादळ 23 ऑक्टोबरला येमेनच्या किनारपट्टीजवळ धडकण्याची शक्यता आहे. पण, यामध्ये आणखी एक शक्यता व्यक्त केली जात आहे. चक्रीवादळ तीव्र झाल्यानंतर दिशा बदलून गुजरात किंवा पाकिस्तानच्या दिशेने देखील जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे. पण, चक्रीवादळ दिशा बदलण्याची शक्यता फारच कमी आहे, असंही स्कायमेटनं म्हटलं आहे. चक्रीवादळ येमेनच्या दिशेने जाणार असलं तरी यामुळे मुंबईसह कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp