Viral Video : खतरनाक! एका हाताने पंखा थांबवतो आणि भक्तांना लगेच...; लड्डू मुत्या बाबा आहे तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 Laddu Mutya Baba Fan Video Viral
Laddu Mutya Baba Video Viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एका हाताने पंखा थांबवणाऱ्या लड्डू मुत्या बाबाची रंजक कहाणी जाणून घ्या

point

लड्डू मुत्या बाबाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी...

point

लड्डू मुत्या बाबाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल

Laddu mutya Baba Video :फिरता पंखा हातांनी थांबवणाऱ्या लड्डू मुत्या बाबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा बाबा वेगाने फिरणारा पंखा एका हाताने थांबवून त्यावर लागलेली धूळ आपल्या कपाळावर लावतो आणि लोकांना आशिर्वाद देतो. इंटरनेटवर अनेक चमत्कारी बाबांचे व्हिडीओ व्हायरल होतात. पण या 'फॅनबाबा'चं विषयच हार्ड आहे. गेल्या काही दिवसांपासून हा फॅनबाबा प्रकाशझोतात आला असून सोशल मीडियावर या बाबाची तुफान चर्चा रंगते आहे. (A video of Laddu Mutya Baba stopping a rotating fan with his hands has gone viral on social media. This baba stops the fast moving fan with one hand and puts the dust on it on his forehead and blesses people)

ADVERTISEMENT

लड्डू मुत्या बाबाच्या या व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, शरीराने अपंग असलेल्या बाबाला काही लोक एका रुममध्ये उचलून घेतात. त्यानंतर हा फॅनबाबा सुसाट फिरणाऱ्या पंख्याला एका हाताने थांबवतो आणि त्या लोकांना आशीर्वाद देतो. बाबा ज्या माणसावर हात लावतो, त्याचे सर्व दुख: कमी होतात आणि तो माणूस सुखी होतो, असं लोकांचं म्हणणं आहे. 

हे ही वाचा >> IND vs BAN: भारताचा हुकमी एक्काच! रोहित शर्माचा मोठा कारनामा, विराट कोहलीचा विक्रम मोडला

नेटकऱ्यांनी लड्डू मृत्याबाबाच्या बनवल्या मजेशीर रिल्स

या व्हिडीओत दिसणारा लड्डु मुत्या बाबा कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्याचा रहिवासी आहे. या बाबाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असल्याने त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. एका हातात पंखा थांबवण्याचा चमत्कार पाहण्यासाठी आणि बाबाचं दर्शन घेण्यासाठी लोकांच्या रांगाच रांगा लागतात. मुत्या बाबा फक्त पंखाच थांबवत नाही, तर प्रवचनाच्या माध्यमातून अनेकांच्या समस्या सोडवण्याचाही प्रयत्न करतो. लोकं या बाबाला 'पंखेवाले बाबा' म्हणून ओळखतात.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Kolhapur Crime: आईचं हृदय, लिव्हर, मेंदूला मीठ-मसाला लावूून खाणाऱ्या नराधमाला सर्वात भयंकर शिक्षा

या बाबाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर रिल्सही बनवल्या आहेत. कारण हे फॅनबाबा पंखा तर फिरवतातच पण त्या पंख्यावर लागलेली धूळ लोकांच्या डोक्यावर लावून त्यांना आशीर्वाद देतात. बाबाचा ही अनोखी पद्धत पाहून नेटकरीही पोट धरून हसू लागले आहेत. बाबाच्या या व्हिडीओला काही नेटकऱ्यांनी विरोध दर्शवला असून काहींनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT