Kolhapur Crime: आईचं हृदय, लिव्हर, मेंदूला मीठ-मसाला लावूून खाणाऱ्या नराधमाला सर्वात भयंकर शिक्षा
Man Convicted For Murdering Mother, Eating Her Organs : महाराष्ट्राच्या कोल्हापूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. येथील माकडवाला वसाहतीत राहणाऱ्या एका 35 वर्षांच्या व्यक्तीने त्याच्या 63 वर्षांच्या आईची क्रुरपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आईची क्रूरपणे हत्या करून तिच्या शरीराचे अवयव खाणाऱ्याला न्यायालयाने सुनावली भयंकर शिक्षा
कोल्हापूरात त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
...म्हणून नराधम मुलाने आईची क्रूरपणे हत्या केली
Son Brutally Kills Mother In Kolhapur : महाराष्ट्राच्या कोल्हापूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. येथील माकडवाला वसाहतीत राहणाऱ्या एका 35 वर्षांच्या व्यक्तीने त्याच्या 63 वर्षांच्या आईची क्रूरपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुनील कुचकोरवी असं आरोपीचं नाव आहे. दारु पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले होते. परंतु, वृद्ध महिलेनं तिच्या मुलाल दारू पिण्यास मनाई केली. पण नराधम मुलाने रागाच्या भरात आईची निर्दयीपणे हत्या केली. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने त्याच्या आईचे तुकडे तुकडे केले आणि शरीरातील हृदय, लिव्हर, किडनी बाहेर काढली. त्यानंतर या निर्दयी मुलाने जे काही केलं, ते पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
सुनीलने 28 ऑगस्ट 2017 ला कोल्हापूर शहरात राहत्या घरी आईची हत्या केली होती. त्यानंतर त्याने आईच्या शरीराचे अवयव कापले आणि तव्यावर भाजून खाल्ले.शेजाऱ्यांना या घटनेबाबत समजताच त्यांच्याही पायाखालची वाळूच सरकली. लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. वर्ष 2021 मध्ये स्थानिक न्यायालयाने आरोपी सुनीलला फाशीची शिक्षा सुनावली होती. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आली होती. तीन वर्ष हा खटला सुरु होता. त्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने मंगळवारी कोल्हापूरच्या न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवलं. हायकोर्टने या प्रकरणाला 'रेयरेस्ट ऑफ रेयर केस' असं म्हटलं आहे.
हे ही वाचा >> Pune Helicopter Crash : पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं! 3 जणांचा जागीच मृत्यू
डीएनए प्रोफाईलिंगमधून बाहेर आलं सत्य
या हत्येचा तपास करणारे पोलीस निरीक्षक एसएस मोरे यांनी म्हटलं होतं, मी मुंबई आणि महाराष्ट्राच्या नक्षलवादी भागात खुनाचे अनेक प्रकरण पाहिले आहेत. पण ही घटना आतापर्यंतची सर्वात क्रूर घटना होती. आम्ही मृत महिलेच्या शरीराचे तुकडे डीएनए फ्रोफायलिंगसाठी पाठवले होते. आमच्याकडे 12 साक्षीदार होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने म्हटलं, आरोपी सुनील कुचकोरवीच्या फाशीच्या शिक्षेची पुष्टी करत आहोत. आरोपी सुधारण्याची कोणतीच शक्यता नाही. हे नरभक्षक प्रकरण आहे. तर हायकोर्टाने गंभीर प्रकरणाबाबत म्हटलं, आरोपीने फक्त आईची हत्याच केली नाही, तर तिच्या शरीरातील हृदय, मेंदू, किडनी आणि लिव्हर काढला आणि त्याला तव्यावर भाजून खाल्ला.
हे ही वाचा >> Maharashtra weather: धुरकट हवा, दमट वातावरण; महाराष्ट्रावर घोंगावतंय मोठं संकट? IMD चा इशारा
हायकार्टाने सांगितलं फाशी देण्याचं कारण
मुंबई हायकोर्टाने म्हटलं की, आरोपी सुनील कुचकोरवीची सुधारण्याची काहीच शक्यता नाही. कारम त्याच्यात नरभक्षक प्रवृत्ती आहे. जर त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली, तर तो तुरुंगातही अशाप्रकारचा गुन्हा करू शकतो. सुनीलने 28 ऑगस्ट 2017 ला कोल्हापूर शहरात राहत्या घरी आईची हत्या केली. त्यानंतर त्याने आईच्या शरीराचे अवयव कापले आणि तव्यावर भाजून खाल्ले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT