Pune Helicopter Crash: सुनील तटकरेंना आणायला चाललेलं हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
Pune Helicopter Crash : पुण्यात भल्या पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं (Helicopter Crash) आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं
अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर
हेलिकॉप्टर कोसळण्यामागील नेमकं कारण काय?
Pune Helicopter Crash : पुण्यात भल्या पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं (Helicopter Crash) आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी पावणेसात वाजता हा अपघात झाल्याचे समजते. हा अपघात कसा घडला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. पण धुळकट आणि धुरकट वातावरणामुळे हे हेलिकॉप्टर कोसळलं असल्याचा अंदाज आहे. (pune helicopter crash news in bavdhan budruk due to fog 3 people died)
ADVERTISEMENT
अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर होता. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले. यामध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सुनील तटकरेंना आणायला चाललेलं हेलिकॉप्टर कोसळलं...
पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं ज्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा यांचा समावेश आहे. याच हेलिकॉप्टरने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रवास करणार होते अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा : Maharashtra weather: धुरकट हवा, दमट वातावरण; महाराष्ट्रावर घोंगावतंय मोठं संकट? IMD चा इशारा
ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे डोंगराळ भाग आहे. त्यामुळे दाट धुके असल्याने हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे सांगितले जाते. अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर जागीच ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या ठिकाणी ऑक्सफर्ड काउंटी नावाचे एक रिसॉर्टही आहे. हे रिसॉर्ट मुळशीपासून काही अंतरावर आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने हिंजवडी पोलिसात ही माहिती दिली. यानंतर, हिंजवडी पोलीसांच्या कंट्रोल रुमला या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलीस आणि इतर यंत्रणा बचावकार्यासाठी दाखल झाल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT