Ram Mandir सोहळ्याचं CM शिंदेंना आमंत्रण, पण ठाकरेंना नाही; हे आहे कारण
राम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे हे नाशिक येथील काळाराम मंदिरात जाणार आहेत. पण, त्यांना आमंत्रण का दिलं गेलं नाही, याबद्दलच्या कारणांची चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
Eknath Shinde Uddhav Thackeray Ram Mandir Inauguration : २२ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे नाशिक येथील काळाराम मंदिरात जाणार आहेत. अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याचं ठाकरेंना आमंत्रण देण्यात आलेलं नाही, त्यामुळे ते काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. पण, देशभरातील सर्व मान्यवरांना कार्यक्रमाचे आमंत्रण असताना ठाकरेंना का नाही? असा प्रश्नही उपस्थित होतोय. या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्या एका ट्विटमुळे समोर आलंय. शिंदे यांना या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं. याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली.
ADVERTISEMENT
२२ जानेवारी रोजी अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना सोहळा केला जाणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने केली जात आहे. या सोहळ्यासाठी महत्त्वाच्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. याची चर्चा होत असतानाच सोमवारी (८ जानेवारी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्कप्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी ठाणे येथील निवासस्थानी भेटून मुख्यमंत्री शिंदेंना आमंत्रण दिलं.
एकनाथ शिंदेंनी आमंत्रण स्वीकारल्यानंतर काय म्हटलंय?
राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर शिंदेंनी ट्विट केलंय. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना पाहणार.. अयोध्येला जाणार !! अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून आज या सोहळ्याचे आमंत्रण मला देण्यात आले.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> “ठाकरे गटाचे 16 आमदार अपात्र होतील”, निकालाआधी शिंदेंच्या आमदाराचा दावा
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्कप्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी ठाणे येथील निवासस्थानी येऊन मला अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी आमंत्रित केले. या आमंत्रणाचा विनम्रपणे स्वीकार केला”, असे शिंदेंनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंना आमंत्रण न मिळण्याचं कारण काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेता म्हणून या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शिंदेंनीही हा मुद्दा ठळकपणे अधोरेखित केला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे. त्यामुळेच शिवसेनेचे नेते म्हणून शिंदेंना आमंत्रित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांचा गट मूळ शिवसेना नसल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. ठाकरेंच्या गटाला स्वतंत्र नाव आणि निवडणूक चिन्हही देण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> “सत्ता बळकावण्याचे…”, दोषींना सोडणाऱ्या गुजरात सरकारला सुप्रीम कोर्टाने झापले
राम मंदिर तीर्थक्षेत्र आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे की, सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाच सोहळ्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे. आयोगाच्या निर्णयानुसार उद्धव ठाकरे हे मूळ शिवसेनेचे नेते नाहीत, त्यामुळेच त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं गेलं नसावं, असंही आता म्हटलं जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT