Nagpur मध्ये अचानक का भडकली एवढी हिंसा? घटनेची A to Z स्टोरी

योगेश पांडे

Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीवरून थेट नागपुरात हिंसा झाली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचं दिसून आलं आहे.

ADVERTISEMENT

नागपुरात अचानक का भडकली एवढी हिंसा? घटनेची A to Z स्टोरी
नागपुरात अचानक का भडकली एवढी हिंसा? घटनेची A to Z स्टोरी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरमध्ये अचानक भडकली हिंसा

point

महल परिसरात तुफान दगडफेक आणि जाळपोळ

point

नागपुरात नेमका का उसळला हिंसाचार

नागपूर: औरंगजेबाच्या कबरीवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निदर्शने केल्यानंतर नागपुरात आज (17 मार्च) अचानक परिस्थिती तणावपूर्ण झाली. मुस्लिम समुदायाचा आरोप आहे की, बजरंग दलाने जाळलेल्या चादरीवर काही कलमा लिहिले होते. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या. दरम्यान, यानंतर अचानक नागपुरातील महल परिसरात हिंसाचार भडकला. ज्यामुळे महल परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. तसंच जाळपोळ देखील करण्यात आली.  

नागपुरात अचानक हिंसाचार का भडकला?

औरंगजेबाची कबर काढण्यात यावी या मागणीसाठी आज सकाळी नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निदर्शनं करण्यात आली होती. पण आता या सगळ्या घटनांना वेगळं स्वरूप लागलं आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतीकात्मक कबर जाळली. त्यादरम्यान, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी एका चादरीचा वापर केला. त्यावर काही कलमा लिहिलेले होते.

मुस्लिम समुदायाचे म्हणणे आहे की, यासंदर्भात नागपूरच्या महल परिसरात असलेल्या शिवाजी पुतळ्यासमोर मुस्लिम समुदायाने निदर्शने केली. पण पोलिसांनी निदर्शकांना तिथून हुसकावून लावले.

हे ही वाचा>> Big Breaking: CM फडणवीसांच्या नागपुरात दोन गटात तुफान राडा, दगडफेक आणि जाळपोळ

त्यानंतर, मुस्लिम समाजातील लोक नागपूरच्या गणेश पेठ पोलीस ठाण्यात पोहोचले आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्याविरुद्ध एफआयआर नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी करू लागले.

हे वाचलं का?

    follow whatsapp