PUNE: ‘मी माझ्या देहाचा त्याग करतोय..’ 9 विद्यार्थ्यांनी शाळा सोडताच शिक्षकाने वर्गातच…

मुंबई तक

ADVERTISEMENT

zp school teacher committed suicide in classroom by taking poison a shocking incident has taken place in pune daund
zp school teacher committed suicide in classroom by taking poison a shocking incident has taken place in pune daund
social share
google news

Pune Teacher Suicide: वसंत मोरे, पुणे: विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने प्राथमिक शिक्षकाने (Teacher) नैराश्याच्या भरात वर्गातच आत्महत्या (Suicide) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना ही पुणे (Pune) जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात घडली आहे. दौंड तालुक्यातील जावजीबुवा येथील ही घटना आहे. (zp school teacher committed suicide in classroom by taking poison a shocking incident has taken place in pune daund)

ADVERTISEMENT

एका प्राथमिक शाळेतच हा सगळा प्रकार घडला आहे. जावजीबुवाची वाडी येथील शिक्षकाने दहापैकी 9 विद्यार्थ्यांनी जवळच्या दुसऱ्या बहुशिक्षकी शाळेत प्रवेश घेतल्याच्या कारणावरून निराश झालेल्या 46 वर्षीय शिक्षकाने वर्गातच विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हे ही वाचा>> Raj surve : आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाविरुद्ध म्युझिक कंपनीच्या सीईओचं अपहरण केल्याचा गुन्हा

नेमकी घटना काय?

अरविंद देवकर असे शिक्षकाचे नाव असून दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. या शिक्षकाने शाळेतील विद्यार्थ्यांना साफसफाईचे काम करायला सांगितले होते. पण याच गोष्टीचा राग मनात धरून येथील पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Jalgaon : CM शिंदेंविरोधात बातमी छापली, पत्रकारावर जीवघेणा हल्ला; पहा Video

या गोष्टीचा शिक्षकाला प्रचंड पश्चाताप झाला आणि त्या निराशेतूनच शिक्षकाने विषारी औषध पिऊन आपले आयुष्य संपवले. आत्महत्या केलेल्या शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहून ठेवली हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शिक्षकाची हेलावून टाकणारी सुसाइड नोट

मी. श्री. अरविंद ज्ञानेश्वर देवकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होवेवस्ती पद उपशिक्षक नियुक्ती दिनांक 30/5/2023 एकूण सेवा 19 वर्ष 4 महिने.

पहिली शाळा जि. प. प्राथ. शाळा खुपटेवस्ती 12 वर्ष, दुसरी शाळा जि. प प्राथ. शाळा मिरवडी 6 वर्ष आणि तिसरी शाळा जि. प. प्राथ. शाळा होलेवस्ती, ता दौंड, जि. पुणे 2 महिने.

शाळा खुपटेवस्ती खाणि मिरवडी या ठिकाणी माझी सेवा चांगली झाली कारण चांगले सहकारी शिक्षक लाभल्याने. परंतु होलेवस्ती या ठिकाणी एकशिक्षकी शाळा असल्याने सुरुवातीला कामाच्या गोंधळात मी बावरून गेलो. मला पाहिजे त्या पद्धतीने पालकवर्गाची मने जिंकता आली नाहीत.

जून महिन्यात सुरुवातीचे 13 दिवस मी विद्यार्थ्याना अध्यापन करु शकलो नाही.. कारण शाळा मैदान साफसफाई, लिखाणकाम आणि विद्यार्थ्यांची ओळख गप्पा, गाणी, गोष्टी यामध्ये वेळ गेला. त्यात विद्यार्थ्यांकडून मी आणि विद्यार्थी शौचालय साफ करून घेणे ही गोष्ट पालकांना खटकली.

त्यातच शाळा व्यवस्थापन समितीची मिटींग घेतल्यानंतर कणकणी आल्याने जेवणाच्या सुट्टीत 1.30 ते 2.30 वेळेत 20 मिनिटे गोळी खाऊन आराम केला. त्यातच एका विद्यार्थ्याला दुखापत झाली.. या माझ्या चुकांमुळे पालकवर्ग नाराज होऊन या शाळेतील 10 विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी हे खालच्या जि. प. प्राथ. शाळा जावनीबुवाची वाडी या ठिकाणी प्रविष्ट केली आणि शाळेत 1 (एकच) इ. पहिलीत विद्यार्थी राहिला.

या घटनेनंतर जी पालकवर्गाची माफी मागून विनंती करूनही फक्त एकच संधी दया अशी विनवणी करूनही मला कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अपराधीपणाची भावना माझ्या मनात खोलवर रुजली.

याला फक्त मी आणि मीच जबाबदार असून सहनशिलता संपल्याने, समाजाचे माझ्याकडून नुकसान झाल्याने याच पवित्र मंदिरात मी माझ्या देहाचा त्याग करीत आहे यास सर्वस्वी मीच जबाबदार आहे. कोणासही जबाबदार धरु नये.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT