Mumbai Tak /बातम्या / ‘बाकीचे 34 लोक कुठेय?’, सुषमा अंधारेंनी सोमय्यांनी गाठलं खिंडीत, इतिहासच काढला
बातम्या शहर-खबरबात

‘बाकीचे 34 लोक कुठेय?’, सुषमा अंधारेंनी सोमय्यांनी गाठलं खिंडीत, इतिहासच काढला

sushma andhare press conference today: साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांना इशारा दिला. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांनी केलेल्या आरोपांचा इतिहासच काढला. प्रताप सरनाईकांपासून ते अनिल परबांपर्यंत सोमय्यांनी केलेल्या आरोपांबद्दल उलट सवाल करत सुषमा अंधारेंनी सोमय्यांना कात्रीत पकडलं.

पुण्यात सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्या म्हणाल्या, “स्वच्छतादूत किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. ती पत्रकार परिषद असण्यापेक्षा नाक्यावर टपोरी पोरांनी बंबाट्या माराव्या अशी ती होती. ईडीच्या प्रमुखपदावर सोमय्यांची वर्णी लागली असावी, इतक्या आत्मविश्वासाने ते बोलत होते.”

पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, “9 पक्षप्रमुखांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. या देशाचा घटनात्मक प्रमुख म्हणून पंतप्रधानांकडे बघितले जाते आणि त्या खुर्चीमध्ये व्यक्ती कोण आहे, हे महत्त्वाचं नसतं. त्यामुळे ते पत्र लिहिलं होतं. त्यावर अपेक्षित असं होतं की, पंतप्रधानांनी त्यावर उत्तर द्यायला हवं होतं, कारण ते उत्तरदायी आहेत. ते भाजपचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान आहेत, असं असतानाही भाजपचे प्रवक्ते जास्त बोलायला लागले.”

सुषमा अंधारे यांनी भाजपला लक्ष्य केलं. त्या म्हणाल्या, “ज्यांच्यावर कारवाया सुरू आहेत, ते बिगर भाजपचे आहेत. 98 टक्के लोक बिगर भाजपचे आहेत. ज्या 2 टक्के भाजपशी संबंधित लोकांवर कारवाई होतेय, त्यांची उपयोगिता संपली असेल. जे भाजपमध्ये जातात, त्यांच्यावरच्या कारवाया थांबतात, मग ते काळ्याचं पांढरं करणारं मशीन आहे का?”

फडणवीसांच्या सांगण्यावरून गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूंचा बुध्यांक किती?: सुषमा अंधारे

किरीट सोमय्यांनी वेगवेगळ्या नेत्यांसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदा आणि ट्विटचा अंधारेंनी दिला आकडा

सुषमा अंधारे म्हणाल्या, “सोमय्यांमुळे भाजपचं सरकार स्थापन झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ते राजकारणी कमी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते जास्त आहेत. त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केला होता. त्यांनी 22 पत्रकार परिषदा घेतल्या आणि 55 ट्विट केले. आनंद आडसुळ यांच्याबद्दल 6 पत्रकार परिषदा आणि 20 ट्विट केले. भावना गवळींविरोधात 8 पत्रकार परिषदा घेतल्या आणि 224 ट्विट केले.”

“यशवंत जाधवांविरोधात त्यांनी 16 पत्रकार परिषदा घेतल्या. अर्जून खोतकरांसाठी त्यांनी 9 पत्रकार परिषदा घेतल्या. सदानंद कदम प्रकरणात किरीट सोमय्यांनी खेड, दापोलीला 11 वेळा भेटी दिल्या. किरीट सोमय्या कोण आहे? ईडीचे कर्मचारी आहेत का? सोमय्यांनी अनिल परबांसाठी 245 ट्विट केले आणि 45 पत्रकार परिषदा घेतल्या”, अशी माहिती अंधारेंनी दिली.

शिवसेनेत प्रवेश करताच उद्धव ठाकरेंकडून ‘प्रमोशन’; कोण आहेत सुषमा अंधारे?

सुषमा अंधारेंनी किरीट सोमय्यांनी आरोप केलेले सर्वच प्रकरण काढली

सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांची आकडेवारीच मांडली. भावना गवळी, यशवंत जाधव, अर्जून खोतकर, नारायण राणे, प्रताप सरनाईक यांच्याबद्दल केलेल्या आरोपांचा लेखाजोखाच वाचून दाखवला.

या लोकांवर किरीट सोमय्यांनी आरोप केले, मात्र हे लोक भाजपमध्ये गेल्यानंतर या प्रकरणाचं काय झालं? किरीट सोमय्या यावर आता काहीच का बोलत नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

किरीट सोमय्यांना आधीच कागदपत्रे कशी मिळतात?

किरीट सोमय्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गाळा हडप केल्याचा आरोप केलेला आहे. याच प्रकरणात सोमय्यांनी काही ट्विट केले होते. त्यावर सुषमा अंधारेंनी बोट ठेवलं. जी कागदपत्रे किशोरी पेडणेकर यांना मिळाली, त्याच्या आधीच ती सोमय्यांनी ट्विट केली, महत्त्वाचं म्हणजे सही होण्याआधीच त्यांनी हे केलं, मग ही कागदपत्रे त्यांना कशी मिळतात? हसन मुश्रीफ प्रकरणातही त्यांना आधीच कागदपत्रे मिळाली. याची न्यायालयानेही दखल घेण्याची गरज असल्याचं आणि सोमय्यांना ही कागदपत्रे कशी मिळतात याबद्दल केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

साई रिसॉर्ट प्रकरण सुषमा अंधारेंचा किरीट सोमय्यांना सवाल

सदानंद कदम यांना अटक झालेल्या साई रिसॉर्ट प्रकरणाबद्दल त्यांनी सोमय्यांना सवाल केला. “त्यांनी जे म्हटलेलं आहे की, एसआरएझेडच्या जागेबद्दल की त्यांनी भूखंड लाटले. एसआरएझेडच्या त्या जागेची जी परवानगी मिळाली आहे, ती एकट्या सदानंद कदम यांच्या रिसॉर्टला ती नव्हती. त्याच दिवशी अशीच परवानगी 35 लोकांना मिळाली. ज्या 35 लोकांना परवानगी मिळाली, नंतर एनए परवानगी मिळाली.”

पुढे त्या म्हणाल्या, “जर एसआरएझेडची परवानगी नसती, तर एनएची परवानगी मिळाली नसती. परवानगी दिल्यावरच मी बांधकाम करेल ना? मग दोष कुणाचा आहे, अधिकाऱ्यांचा. अधिकाऱ्यांना का सोडून दिलं? 35 लोकांना परवानगी मिळाली, तर बाकीचे 34 जण कुठे आहेत? एकटा 35वा माणूसच कसा काय रडारवर येतोय? 34 लोक कुठे आहेत?”, असा सवाल सुषमा अंधारेंनी किरीट सोमय्या यांना केला.

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा