Islamic Hackers: ठाणे पोलिसांसह भारतातल्या सरकारी वेबसाईट्स हॅक

वाचा सविस्तर बातमी, समजून घ्या नेमकं काय घडलं
Islamic Hackers: ठाणे पोलिसांसह भारतातल्या सरकारी वेबसाईट्स हॅक
Thane police website hacked by Islamic hackers

भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच नागपूर इन्स्टिट्युट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Thane police website hacked by Islamic hackers
Thane Police : मुंब्रा पोलीस ठाण्यातील १० पोलीस अधिकारी-कर्मचारी खंडणी प्रकरणी निलंबित

मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशातल्या अनेक वेबसाईट्स हॅक केल्या गेल्या आहेत. या ग्रुपने जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक करण्याचं आवाहन केलं होतं. नुपूर शर्मांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं. मुस्लिम धर्मीयांची माफी मागा हाच संदेश हॅकर्सनी वेबसाईट हॅक केल्यावर दिला आहे.

नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आखाती देशांमध्येही उमटले होते. त्यानंतर नुपूर शर्मा यांनी माफीही मागतिली. तसंच भाजपने त्यांना निलंबितही केलं. मात्र या प्रकरणाचे पडसाद थांबताना दिसत नाहीत.

मागच्या काही दिवसांपासून देशात मंदिर-मशिदीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. तसेच मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्यावरील टिप्पणी प्रकरणामुळं देशात अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांच्यासह मुस्लिम समाजातील दिग्गजांनी देशात मुस्लिम असुरक्षित असल्याची वक्तव्य केली आहेत.

Thane police website hacked by Islamic hackers
Aurangabad protest नुपूर शर्मांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा, नगरमध्ये बंदची हाक

दरम्यान, राज्य सरकारच्या गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. सध्या ठाणे पोलिसांची वेबसाईट रिस्टोअर करण्याचं काम सुरु आहे.

दोन दिवसांपूर्वी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स शासकीय विज्ञान महाविदयालयाची वेबसाईट हॅक झाली होती. याची जबाबदारीही ड्रॅगन फोर्स ऑफ मलेशिया या संघटनेनं घेतल्याची माहिती त्यावेळी मिळाली होती. यात भारताविरुद्ध मोहीमेचा भाग म्हणून साईट हॅक केल्याचा मेसेजचा त्या वेबसाईटवर उल्लेख करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in