शिव संवाद यात्रा : फॉक्सकॉन प्रोजेक्ट पुन्हा महाराष्ट्रात; आदित्य ठाकरेंचं शिंदेंच्या वर्मावर बोट
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. ४० आमदारांना घेऊन सूरत मार्गे गुवाहाटी आणि नंतर गोव्याला गेले आणि परत आले. याच घटनाक्रमावरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना डिवचलं. यावेळी त्यांनी गुजराततेत गेलेल्या फॉक्सकॉन-वेदांता प्रकरणावर मिश्किल भाष्य केलं. “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल; सुरतेला पळून गेले” “हे बंडखोर असते. यांना क्रांती करायची असती, तर हे जागेवर […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. ४० आमदारांना घेऊन सूरत मार्गे गुवाहाटी आणि नंतर गोव्याला गेले आणि परत आले. याच घटनाक्रमावरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना डिवचलं. यावेळी त्यांनी गुजराततेत गेलेल्या फॉक्सकॉन-वेदांता प्रकरणावर मिश्किल भाष्य केलं.
“काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल; सुरतेला पळून गेले”
“हे बंडखोर असते. यांना क्रांती करायची असती, तर हे जागेवर उभे राहिले असते. हे जागेवर उभे राहिले नाहीत. तर पळून गेले. पळून कुठे गेले, तर आधी सुरतेला. तिथून गुवहाटीला गेले. तिथे काय डोंगार, काय झाडी, काय हाटेल बघितलं”
फॉक्सकॉन-वेदांता प्रोजेक्ट पुन्हा महाराष्ट्रात येणार; ठाकरेंचा शिंदे गटाला चिमटा
“मला कालपरवा कुणीतरी सांगितलं की, आदित्य घाबरू नको. वेदांता-फॉक्सकॉन तुमच्याकडेच परत येणार. तुला कळत नाहीये, ते आधी गुजरातला गेलेत. तिथून गुवाहाटीला जाणार आणि मग परत आणणार. नंतर महाराष्ट्रात येणार. ते थेट महाराष्ट्रात कसे येणार. हेच आपल्या राज्यात झालेलं आहे. आपण गद्दारीला बंड समजायला लागलोय”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना डिवचलं.
vedanta foxconn Project : ‘तुम्ही भित्रे होतात, आम्ही 40 वार पाठीवर घेतलेत आणि आणखी घेऊ’; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्ला