Tunnel Rescue : 41 मजुरांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारा ‘देवदूत’, कोण आहेत Arnold Dix?

भागवत हिरेकर

Arnold Dix : ४१ मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती ऑस्ट्रेलियाच्या अर्नोल्ड डिक्स यांनी. ते नेमके कोण आहेत आणि सरकारने त्यांनाच का बोलावले होते, याबद्दल जाणून घ्या…

ADVERTISEMENT

who is arnold dix, who rescued 41 laborers from Silkyara tunnel.
who is arnold dix, who rescued 41 laborers from Silkyara tunnel.
social share
google news

Tunnel Rescue, who is Arnold Dix : ऐन दिवाळीच्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यामध्ये ४१ मजूर अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर २८ नोव्हेंबर रोजी या मजुरांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आले. या सगळ्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका ठरली ती अर्नोल्ड डिक्स यांची. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या अर्नोल्ड डिक्स यांना बोलवण्यात आले होते. ते नेमके कोण आहेत, हेच जाणून घेऊयात…

उत्तरकाशीच्या सिलक्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ते आता मोकळा श्वास घेत आहेत. पण 17 दिवस चाललेल्या या बचाव मोहिमेचे यश अर्नोल्ड डिक्सशिवाय अपूर्ण आहे.

अर्नोल्ड डिक्स यांची भूमिका कशी ठरली महत्त्वाची?

अर्नोल्ड यांनी कामगारांना बोगद्यातून बाहेर काढलेल्या तज्ञांमध्ये मोठी भूमिका बजावली. ते भूमिगत आणि वाहतूक पायाभूत सुविधा क्षेत्रातील तज्ञ आहेत. ते केवळ भूमिगत बांधकामाशी संबंधित जोखमींबद्दल सल्ला देत नाही, तर त्यावर त्यांनी प्रभूत्व मिळवलेलं आहे.

Tunnel Rescue : डिक्स यांनी वचन दिलं अन् पूर्ण केलं

अर्नोल्ड डिक्स हे जिनिव्हा येथील इंटरनॅशनल टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख आहेत. ही कंपनी भूमिगत बांधकामासाठी कायदेशीर, पर्यावरणीय, राजकीय आणि इतर जोखमींवर सल्ला देण्याचे काम करते.

हे वाचलं का?

    follow whatsapp