विंग कमांडर एस. एस. मराठे हॅरिस पुलाखाली पाण्यात कुटुंबासह अडकले, अग्निशमन दलानं वाचवलं

मुंबई तक

पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो आहे. अनेक शहरांमध्ये सखल भागात पाणी साठण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सोडवून सुरक्षित स्थळी नेलं जातं आहे. पुण्यातल्या खडकी भागात अशीच एक घटना घडली. खडकी-बोपोडी येथील हॅरिस पुलाखालच्या पाण्यात विंग कमांडर मराठे हे त्यांच्या कुटुंबासह अडकले होते. त्यांची सुटका करण्यात आली आहे. काय घडली घटना? […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो आहे. अनेक शहरांमध्ये सखल भागात पाणी साठण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सोडवून सुरक्षित स्थळी नेलं जातं आहे. पुण्यातल्या खडकी भागात अशीच एक घटना घडली. खडकी-बोपोडी येथील हॅरिस पुलाखालच्या पाण्यात विंग कमांडर मराठे हे त्यांच्या कुटुंबासह अडकले होते. त्यांची सुटका करण्यात आली आहे.

काय घडली घटना?

खडकी – बोपोडी येथील हॅरिस पुलाखालील पाण्यात विंग कमांडर एस एस मराठे हे त्यांच्या कारमध्ये कुटुंबासह अडकले होते. खडकी कॅन्टोन्मेंटच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ही कार पाण्याबाहेर काढली. मराठे यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुले, एक कुत्रा यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली.

मागच्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे बोपोडी हॅरिस पुला खालील रस्त्यावर पाणी आले आहे. विंग कमांडर एस. एस. मराठे यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते नेहमीप्रमाणे पुलाखालील रस्त्यावरून कार घेऊन जात होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp