सट्टेबाजांशी डीलचा प्लान, 1 कोटींची ऑफर, अमृता फडणवीसांनी सांगितलं सगळं प्रकरण

मुंबई तक

Amruta Fadnavis latest News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पैसा उकळण्याचा प्लान सांगत पेशाने डिझायनर असलेल्या महिलेने 1 कोटींची ऑफर दिल्याचा प्रकार समोर आला. नेमकं काय घडलं? डिझायनर महिला कशी भेटली? तिने काय मागण्या केल्या, याबद्दल अमृता फडणवीसांनी सगळी माहिती दिलीये. (1 crore bribe offer to Amruta Fadnavis, Daughter of top bookie […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Amruta Fadnavis latest News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पैसा उकळण्याचा प्लान सांगत पेशाने डिझायनर असलेल्या महिलेने 1 कोटींची ऑफर दिल्याचा प्रकार समोर आला. नेमकं काय घडलं? डिझायनर महिला कशी भेटली? तिने काय मागण्या केल्या, याबद्दल अमृता फडणवीसांनी सगळी माहिती दिलीये. (1 crore bribe offer to Amruta Fadnavis, Daughter of top bookie posed as designer)

अमृता फडणवीस यांनी या प्रकरणाची सर्व माहिती पोलिसांना दिलेली आहे. ज्या तरुणीने अमृता फडणवीसांसोबत हा प्रकार केला तिचं नाव अनिक्षा असं आहे. अमृता फडणवीसांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे की, “अनिक्षाने असं सांगितलं की, ती कपडे, ज्वेलरी आणि फूटवेअर्स डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेल्या वस्तू सार्वजनिक कार्यक्रमात मी परिधान कराव्यात, जेणेकरून वस्तूंचं प्रमोशन होईल. मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली आणि मी तिला होकार दिला.”

ती डिझायनर अमृता फडणवीस यांना कशी भेटली?

अमृता फडणवीसांनी पुढे म्हटलंय की, “ही डिझायनर मला नोव्हेंबर 2021 रोजी भेटली होती. आई नसल्याचं तिने सांगितलं. त्याचबरोबर सर्व कुटुंबाची भार आपल्यावरच असल्याचंही तिने मला सांगितलं. पहिल्या भेटीनंतर अनिक्षा मला उपमुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर भेटायला आली होती.”

“एकदा ती आली आणि तिने काही डिझाईन केलेले कपडे आणि ज्वेलरी आमच्या स्टाफमधील एका व्यक्तीकडे दिल्या आणि ते मी परिधान करावेत अशी विनंती केली. ते कपडे मी कधी आणि कुठल्या कार्यक्रमात परिधान केले की नाही, हे मला आठवत नाही. त्या वस्तू माझ्या स्टाफमार्फत मी तिला परत केल्या किंवा दान केल्या असाव्यात. तिच्या वस्तू माझ्याकडे नाहीत”, अशी माहिती फडणवीसांनी पोलिसांना दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp