बीड: विस्कटलेल्या संसाराची घडी बसवण्यासाठी नगरसेविकेच्या पतिकडे गेली अन…
बीड जिल्ह्यातील एका नगरसेविकेचा पती आणि स्वतः राजकीय पुढाऱ्यांनेच महिलेवर बलात्कार केल्याची केज येथे घटना घडली आहे. तिला मदत करतो आणि नोकरी लावून लग्न करतो असे आमिष दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. पीडित महिला तिच्या पतीपासून वेगळं राहत होती. तिच्या तक्रारीवरून ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा केज पोलिसात दाखल करण्यात आला आहे. राजकीय […]
ADVERTISEMENT

बीड जिल्ह्यातील एका नगरसेविकेचा पती आणि स्वतः राजकीय पुढाऱ्यांनेच महिलेवर बलात्कार केल्याची केज येथे घटना घडली आहे. तिला मदत करतो आणि नोकरी लावून लग्न करतो असे आमिष दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. पीडित महिला तिच्या पतीपासून वेगळं राहत होती. तिच्या तक्रारीवरून ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा केज पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
राजकीय पुढारीच बलात्कारी
याबाबत तक्रारीत नमूद केलेली अधिक माहिती अशी की, केजच्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या नगरसेविका आशा कराड यांचे पती तथा पंचायत समितीच्या सदस्या मुक्ताबाई कराड यांचा मुलगा आणि राजकीय पुढारी असलेला सुग्रीव कराड याने एका असहाय्य व एका मुलीची आई असलेल्या परित्यक्ता महिलेवर नौकरी आणि लग्न करण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला. तसेच तिचा गर्भपातही करायला भाग पाडले आहे, असे तिने नमूद तक्रारीत म्हटलं आहे.
नोकरीचे आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी
पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नवऱ्याशी मतभेद झाल्याने ती तिच्या ४ वर्ष वयाच्या मुलीसह आई वडिलांच्या सोबत माहेरी राहत आहे. तिचे नवरा-बायकोतील भांडण मिटवण्यासाठी ती सुग्रीव कराड या राजकीय पुढाऱ्याकडे गेली होती. त्याने त्यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी केली होती. तेंव्हापासून सुग्रीव याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तसेच तिला नोकरी लावून देतो व त्यांचे भांडण मिटवून नांदायला पाठवतो, असे आमिष दाखविले.
दोन महिन्याची गरोदर आणि लग्नाचं आमिष
एकेदिवशी सायंकाळच्या सुमारास पीडिता ही कोव्हिड केंद्रावर कामाला जाण्यासाठी गावातील बस स्टँडवर उभी होती. तिथे अचानक सुग्रीव कराड आला आणि तिला एका पांढऱ्या रंगाच्या चार चाकी गाडीत ओढुन घेवुन गेला आणि एका हॉटेलात तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. नंतर पीडितेला बस स्टँडवर आणून सोडलं. त्यानंतर दोन वर्षांपासून सुग्रीव याने तिच्या सोबत लग्न करतो म्हणून सतत लैंगिक अत्याचार केल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलं.