संसदेतील घुसखोर प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई तक

संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी आता दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने दिल्ली पोलिसांचेही आणि आरोपींचेही कान टोचले आहेत. एकाच अर्जावर अनेक मागणी कशा काय केल्या जाऊ शकता असा सवाल करून पोलीस आयुक्तांच्या त्रिसदस्यीय समितीन निर्णय दिल्यानंतरच आता न्यायालयाकडे तुम्ही दाद मागा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Parliament Security : संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या (terrorist attack) वर्धापनदिनादिवशीच संसदेची सुरक्षा तोडून घुसखोरी करून गोंधळ घालणाऱ्या महेश कुमावतला (Mahesh Kumawat) पुन्हा एकदा 13 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात आली आहे. तर त्याचवेळी त्याच प्रकरणातील दुसरी मुख्य आरोपी नीलम आझादला तिच्या वकिलाला भेटण्याची परवानगीही देण्यात आली आहे. वकिलाला भेटण्यासाठी नीलमच्या (Neelam) कुटुंबीयांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेत वकिलाला भेटण्याची आणि एफआयआरची (FIR) प्रत देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. त्यावेळी न्यायालयाने त्यांना स्वतंत्र याचिका दाखल करण्यास सांगितल्याचे तिच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस कोठडीची काय गरज

महेश कुमावतची शनिवारी सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टात दाखल केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला त्याच्या वकीलाबाबत विचारणा केल्यानंतर माझा कोणीच वकील नसल्याचे त्याने न्यायालयालयाला सांगितले. महेश कुमावतने आपला कोण वकील नसल्याचे सांगितल्यानंतर न्यायालयाने लीगल सेलकडून वकील बोलवायला सांगितले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत दिल्ली पोलिसांनी आरोपीची आणखी 13 दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली. त्यावेळी महेशच्या वकिलाने पोलीस कोठडीला विरोध केला. त्यावेळी त्यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकणातील सर्व पुरावे इलेक्ट्रॉनिक आहेत, तरीही पोलीस कोठडीची काय गरज आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

वकिलाला भेट पण कुटुंबाला नाही

पटियाला हाऊस कोर्टात दोन्हीकडच्या सुनावणी झाल्यानंतर आरोपी महेश कुमावतला 13 दिवसांच्या पोलीस रिमांवडवर पाठवण्यात आले आहे. आता या प्रकरणातील सर्व आरोपी 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत. त्यानंतर या सर्व आरोपींना एकाच वेळी कोर्टात सादर केले जाणार आहे. तर दुसरीकडे हरियाणातील जिंदच्या घासो खुर्दमध्ये राहणारी नीलमला आता तिच्या वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. नीलमचा भाऊ रामनिवासने सांगितले की, न्यायालयाने नीलमला वकिलाला भेटण्याची परवानगी दिली आहे, मात्र तिच्या कुटुंबाला भेटण्याची अजून तिला परवानगी देण्यात आली नाही.

हे ही वाचा >> Shiv Sena : ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-पवारांवर टीकास्त्र, ‘खाल्ल्या ताटात घाण…’

कुटुंबीयांनी दिला नकार

नीलमच्या कुटुंबीयांनी न्यायालयाकडे तिला भेटण्याची परवानगी मागितली होती, मात्र कुटुंबीयाला भेटण्याची परवानगी मिळाली नाही. संसदेतील घुसखोरी प्रकरणी मागच्या वेळी सुनावणी झाली त्यावेळी तिच्या भावाने सांगितले की पोलिसांचे एक पथक आमच्या गावीही आले होते. त्यावेळी त्या पोलिसांनी कोऱ्या कागदावर कुटुंबातील सदस्यांच्या सह्या घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आम्ही त्यावर सह्या केल्या नाहीत. त्यानंतर पोलिसांनी नीलम पुन्हा बेटून या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp