नवी मुंबईला हादरून टाकणारी घटना, दिवसाढवळ्या गोळ्या झाडून बिल्डरची हत्या
Navi Mumbai Crime: नवी मुंबई: नवी मुंबईतील (Navi Mumbai) नेरूळ येथे भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकाची (Builder) गोळ्या झाडून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारने जात असताना बांधकाम व्यावसायिकांवर भररस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यामध्ये सावजी पटेल नामक बांधकाम व्यावसायिकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सध्या नवी मुंबई पोलीस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. (an incident that […]
ADVERTISEMENT

Navi Mumbai Crime: नवी मुंबई: नवी मुंबईतील (Navi Mumbai) नेरूळ येथे भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकाची (Builder) गोळ्या झाडून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारने जात असताना बांधकाम व्यावसायिकांवर भररस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यामध्ये सावजी पटेल नामक बांधकाम व्यावसायिकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सध्या नवी मुंबई पोलीस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. (an incident that shook navi mumbai a builder was shot dead in broad daylight)
नेरूळ येथे सावजी पटेल हे आपल्या वाहतानातून जात असताना एका दुचाकीवरुन आलेल्या दोघा मारेकऱ्यांनी आपल्या पिस्तूलमधून तीन गोळ्या झाडल्या. या गोळ्या सावजी पटेल यांच्या छातीत आणि पोटात घुसल्याने पटेल यांचा जागीच मृत्यू झाला .
पटेल यांची हत्या व्यावसायिक वादातून झाली असावी असा कयास व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.
सावजी पटेल हे आपल्या कारने नेरूळ येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखून या गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाजाने येथील स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. ज्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत तात्काळ फोनवरून माहिती दिली. दरम्यान, ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.