Anjali Murder Case : मंदिर, आई आणि मर्डर… अल्पवयीन मुलीनेच रचला भयंकर कट

मुंबई तक

Anjali Murder Case : आग्र्यात एका उद्योगपतीच्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अंजली बजाज असे या महिलेचे नाव होते. अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात पोलिसांनी सीडिआर पासून सीसीटीव्ही फुटेज तपासले होते.

ADVERTISEMENT

anjali murder case mother murder accused minor daughter lover friend arrested up agra crime story
anjali murder case mother murder accused minor daughter lover friend arrested up agra crime story
social share
google news

Anjali Murder Case : आग्र्यात एका उद्योगपतीच्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अंजली बजाज असे या महिलेचे नाव होते. अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात पोलिसांनी सीडिआर पासून सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. मात्र हत्याकांडाचा जेव्हा पोलिसांनी उलगडा केला तेव्हा, मृत महिलेचा पती म्हणजेच उद्यागेपती बजाज आणि पोलिसांना हादराच बसला. कारण या हत्याकांडाचा मास्टरमाईंड मृत महिलेची पोटची पोरगीच निघाली होती. त्यामुळे या घटनेची चर्चा आता देशात रंगलीय. (anjali murder case mother murder accused minor daughter lover friend arrested up agra crime story)

मुलीच्या शोधात बायको बेपत्ता…

आग्र्यात बुटांचा बिझनेस करणारे उद्योगपती उदित बजाज यांची 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली होती, मात्र खुप वेळ उलटून सु्द्धा ती घरी परतली नव्हती. आपली मुलगी घरात खूप वेळापासून परतली नसल्याने चिंतेतून आईने वडिलांना याची माहिती दिली होती. या दरम्यान मुलीने आईला व्हॉट्सअॅपवर मी बनखंडी मंदिर परिसरात असून तिला घ्यायला येण्यास सांगितले. यानंतर आई घराबाहेर पडली आणि तिने मुलीच्या वडिलांनाही सोबत घेतले. आई-वडील मंदिर परीसरात पोहोचत असतानाच मुलीने वडिलाना फोन करून ती बनखंडी मंदिरातून निघाली असून गुरू ताल ठिकाणी पोहोचल्याची माहिती दिली. यानंतर बजाज यांनी अंजली यांना मंदिर परीसरात सोडून ते गुरु ताल सिकंदरा चौराह ठिकाणी निघाले. जसे वडिल सिकंदरा चौराह पोहोचले मुलीने त्यांना पुन्हा फोन करून मी शास्त्रीपुरममध्ये आपल्या घरी पोहोचल्याची माहिती दिली.

हे ही वाचा : Mira Road: ‘मी नपुंसक आहे, आणि…’, सरस्वती वैद्यची हत्या करणारा मनोज साने असं का म्हणाला?

अंजली मंदिर परीसरातून बेपत्ता

मुलीने घरी पोहोचल्याची माहिती दिल्यानंतर बजाज मंदिर परीसरात बायको अंजलीला घ्यायला निघाले. मात्र मंदिर परीसरात अंजली कुठेच सापडल्या नाहित. त्यांचा फोन देखील बंद येत होतात. नातेवाईकांना देखील फोन लावले, मात्र अंजलीचा काहीच थांगपता लागला नाही. शेवटी संध्याकाळपर्यंत तिची वाट पाहण्याचा निर्णय घेत ते घरी परतले. मात्र अंजली काय घरी परतल्या नाही. शेवटी बुधवारी उशिरा रात्री सिंकदरा पोलिस ठाण्यात अंजली बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीनंतर आग्रा पोलिसांनी अंजलीचा शोध सुरू केला. पोलिसांनी घऱ शास्त्रीपुरम पासून बनखंडी मंदिर या 9 किलोमीटर परीसरात अंजलीचा शोध सुरु केला. मात्र अंजलीचा काही पत्ता लागला नाही. शेवटी गुरुवारी संध्य़ाकाळी मंदिराच्या नजीक जंगलात अंजलीचा मृतदेह सापडला होता.

अंजलीची हत्या

अंजलीचा मृतदेह मंदिर परिसरात असलेल्या जंगलात सापडला. तिच्यावर चाकुने ह्ल्ला करून तिची हत्या करण्यात आली होती. ज्या प्रकारे तिची हत्या करण्यात आली होती, त्यानुसार हे हत्याकांड होते हे पोलिसांना कळुन चुकले होते. अंजलीच्या हत्येनंतर पोलिसांना हत्येचा तपास सुरु केला. व्यावसायिक दुश्मनीतून अंजलीची हत्या करण्यात आल्याचा सुरुवातीला पोलिसांना संशय होता.त्यानुसार तपास सुरु केला. या दरम्यान पोलिसांनी सीडीआर आणि काही सीसीटीव्ही मागवले, यामध्ये पोलिसांना पुरावा सापडला.

हे वाचलं का?

    follow whatsapp