गोव्यातल्या अरंबनोल बीचवर ब्रिटिश महिलेवर बलात्कार, आरोपी अटकेत

बलात्काराच्या घटनेने गोवा हादरलं
गोव्यातल्या अरंबनोल बीचवर ब्रिटिश महिलेवर बलात्कार, आरोपी अटकेत
32-year-old masseuse rapped a British tourist woman near Arambol beach in Goa(प्रातिनिधिक फोटो)

गोव्यात एका ब्रिटिश महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही महिला पर्यटक म्हणून गोव्यात आली होती. ६ जूनला या प्रकरणातल्या आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी गोवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरंबोल बीचवर ब्रिटिश महिला आराम करत होती. त्याचवेळी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी एका ३२ वर्षीय माणसाला अटक करण्यात आली आहे.

(प्रातिनिधिक फोटो)

या प्रकरणी पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपी व्हिन्सेंट डिसूझाला अटक केली आहे. तसंच या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखलही घेतली आहे. गुरूवारी म्हणजेच २ जूनला ही धक्कादाक घटना घडली आहे. त्याने याआधी ग्रंथपाल म्हणूनही काम केलं आहे. पीडित ब्रिटिश महिला ही तिच्या पुरूष साथीदारासोबत पर्यटनासाठी गोव्यात आली होती. तिला बॉडी मसाज देण्याच्या बहाण्याने आलेल्या व्हिन्सेंट डिसूझाने या महिलेवर बलात्कार केला. तिच्यासोबत असलेल्या पुरूष सहकाऱ्याच्या समोरच डिसूझाने तिच्यावर बलात्कार केला.

32-year-old masseuse rapped a British tourist woman near Arambol beach in Goa
मुंबईतल्या धारावीत १९ वर्षीय विवाहितेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार

२ जूनला जेव्हा ही घटना घडली तेव्हा ब्रिटिश महिलेने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तसंच पेरनेम पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार केली असून भारतातील ब्रिटिश दुतावासाकडून मदत मागितली आहे. महिलेने तक्रार केल्यानंतर अवघ्या काही तासात पेरनेम पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली. या आरोपीचा गुन्हेगारीचा काही इतिहास आहे का? याबाबत आता पोलीस माहिती घेत आहेत.

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार या महिलेवर लैंगिक अत्याचार झाला आहे. मसाज देण्याच्या बहाण्याने डिसूझाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आम्ही आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढे तपास करत आहेत. उत्तर गोव्यातल्या आरंबोल बीचवर ही घटना घडली आहे. गोव्यातल्या आरंबोल बीच हा विदेशी पर्यटकांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. या बीचवर ही महिला आराम करत होती तिला मसाज देण्याच्या बहाण्याने आरोपी तिथे आला आणि तिच्यावर अत्याचार केले अशी माहिती पेरनेमचे पोलीस उप अधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी मुंबई तकला दिली आहे.

गोव्यात दरवर्षी हजारो पर्यटक फिरण्यासाठी येतात. गोव्यात विदेशी पर्यटकांसोबत घडलेली ही पहिली घटना नाही. १२ मे रोजी आंरबोल बीचजवळच्या एका रिसॉर्टमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. रशियाहून भारतात पर्यटनासाठी आपल्या कुटुंबासोबत आलेल्या या मुलीवर रिसॉर्टमध्ये बलात्कार झाला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in