Aryan Khan: शाहरुखच्या मुलाला तुरुंगात पाठवणारे समीर वानखेडेच अडकले CBI च्या जाळ्यात
Aryan Khan Drug Case: सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह इतरांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला असून त्यांच्या मुंबईतील घर आणि संबंधित ठिकाणी झाडाझडती सुरू केली आहे.
ADVERTISEMENT

Sameer Wankhede: मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा पाय आता अधिक खोलात गेला आहे. कारण केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) समीर वानखेडेंविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. एवढंच नव्हे तर सीबीआयने त्यांच्या मुंबईतील घराचीही झडतीही घेतली आहे. 2021 मध्ये समीर वानखेडे हे ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आले होते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला समीर वानखेडे यांनीच ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. मात्र, नंतर आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आली होती. या सगळ्या मुद्द्यावरुन माजी मंत्री नवाब मलिक यांनी सर्वात आधी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. (cbi registers corruption case against irs officer sameer wankhede cbi team searching their premises in mumbai)
सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि इतरांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मुंबईतील घरी आणि संबंधित ठिकाणी छापे मारुन झडती देखील घेण्यात आली आहे. वानखेडे हे यापूर्वी एनसीबी (मुंबई झोन) चे प्रमुख होते आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या अटकेमुळे ते वादात सापडले होते.
समीर वानखेडेंविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा का दाखल झाला?
समीर वानखेडेंची चौकशी करण्यासाठी एक व्हिजिलन्स टीम तयार करण्यात आली होती. प्रभाकर साईल हा जो साक्षीदार होता त्याने असा आरोप केला होता की, समीर वानखेडे याने 25 कोटींची लाच घेतलेली आहे. याच आरोपांनंतर व्हिजिलन्स टीम तयार करण्यात आली होती. त्यासंदर्भात चौकशीही सुरू झाली होती. ज्यानंतर आर्यन खान प्रकरणाचा तपासही त्यांच्याकडून काढून घेतला होता.
हे ही वाचा >> पोलीस जावयाला, पोलीस सासऱ्याने घडवली जन्मभराची अद्दल.. आता भोगावी लागणार जन्मठेप!
व्हिजिलन्स टीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांनी या संदर्भात जो रिपोर्ट तयार केला त्यात त्यांनी दावे केले आहेत की, भ्रष्टाचाराचं कलम त्यांच्याविरोधात लावण्यात यावे. कारण काही संशयास्पद गोष्टी यात आढळून येत आहेत. म्हणजेच त्यांच्या उत्पन्नापेक्षा त्यांच्याकडे अधिक संपत्ती असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराप्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ज्यानंतर सीबीआयने FIR दाखल करू नये अशी मागणी वानखेडेंनी कोर्टाकडे केली होती. पण कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली होती.