खुर्चीला हात-पाय बांधून गळा आवळला, संभाजीनगरात 70 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या

ADVERTISEMENT

chhatrapati sambhajinagar murder elderly woman strangulated death nirala bazar parisar driver arrested
chhatrapati sambhajinagar murder elderly woman strangulated death nirala bazar parisar driver arrested
social share
google news

Sambhaji Nagar Murder: खुर्चीला चिकटपटीने हात पाय बांधून 70 वर्षीय महिलेची घरात घुसून गळा आवळून हत्या (murder) करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील निराला बाजार परिसरातील शारदाश्रम कॉलनीत (Sharadashram Colony) वृद्ध महिलेची हत्या (old woman Murder)  करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता चार ते पाच संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. हत्या झालेल्या वृद्ध महिलेचे नाव अलका तळणीकर असल्याचेही सांगण्यात आले.

काही तासात तपास

निराला बाजार परिसरात वृद्ध महिलेची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तपास सुरु केल्यानंतर त्या प्रकरणी चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ही हत्या भाडेकरून म्हणून राहणाऱ्या वाहन चालकाने केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा >>NCP: निवडणूक आयोगात असं काय घडलं की जितेंद्र आव्हाड रडले?, रोहित पवारही आक्रमक

चिकटपटीने हात पाय बांधले

वाहन चालकाला चोरी करताना अलका तळणीकर यांनी पााहिले होते. त्याप्रकरणी त्या चोरीचा प्रकार उघडकीस आणतील म्हणून अशोक वैष्णव याने त्याना खुर्चीला चिकटपटीने हात-पाय बांधून त्यांचा गळा आवळून हत्या केली आहे. त्यानंतर तो मृतदेह तिथेच टाकून तो पसार झाला होता. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसात तक्रार दाखल झाली असून आणखी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाहनचालकाला अटक

शारदा कॉलनीत अलका तळणीकर यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या घरात विचित्र अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. तपास करताना या प्रकरणात अशोक वैष्णवला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आणखी चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा >> Asian Games, Indian Hockey Team: भारताच्या हॉकी टीमला थेट ऑलिम्पिकचं तिकीट, रचला ‘सुवर्ण’ इतिहास

विचित्र पद्धतीने हत्या

अलका तळणीकरांची विचित्र पद्धतीने हत्या करण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही धागेदोरे सापडतात का त्याचा तपास सुरु केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT