गर्लफ्रेंड म्हणाली ‘तू तर ‘नल्ला’, बॉयफ्रेंडने केलं अत्यंत भयंकर कृत्य!
क्षुल्लक कारणावरून आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत गर्लफ्रेंडने नल्ला म्हणून चिडवत मर्दानगीवर सवाल उपस्थित केल्याने तिच्या बॉयफ्रेंडने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. करन मल्होत्रा असे या तरूणाचे नाव आहे.
ADVERTISEMENT

क्षुल्लक कारणावरून आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत गर्लफ्रेंडने (girlfriend) नल्ला म्हणून चिडवत मर्दानगीवर सवाल उपस्थित केल्याने तिच्या बॉयफ्रेंडने (boyfriend) राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. करन मल्होत्रा असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपींविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. (girlfriend and her friend blackmail boyfriend suicide delhi shahdara news)
गर्लफ्रेंड मित्रासोबत फिरली…
वडिलांनी क्राईम तकला दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिलच्या ऱात्री साडे नऊ वाजता करण त्याचा मित्र नवनीतसोबत गुरूग्राम सेक्टरमध्ये गेला होता. या ठिकाणी पोहोचल्यावर करणने त्याच्या गर्लफ्रेंडला (girlfriend) आपल्याच मित्रासोबत फिरताना पाहिले. याबाबत जाब विचारला असता गर्लफ्रेंड आणि मित्र रागावला आणि करणसोबत वाद घालू लागला. या वादातून मित्राने करणला मारहाण देखील केली आणि कारवर विट-दगड फेकून हल्ला केला. दोघांमधील वाद इतका पेटला की, मित्राने चाकू देखील काढून करणवर हल्ला करायचा प्रयत्न देखील केला,मात्र सुदैवाने करण बचावला होता.
हे ही वाचा : बायको दिरासोबत नाचली, अन् भर मंडपात पतीने दोन्ही भावांना मारून टाकलं!
आम्ही एक-दुसऱ्यासोबत शारीरीक संबंध ठेवत आहोत, लवकरच लग्न करणार आहोत. करणमध्ये मर्दानगीची क्षमता नाही,असे करणसमोर म्हणत गर्लफ्रेंड आणि त्याच्या मित्राने उकसवण्याचाही प्रयत्न केला. दोघेही इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी कारच्या तूटलेल्या खिडकीचा फोटो काढून, ‘जैसी नल्ली कार वैसा नल्ला करा’ असे स्टेटसवर ठेवण्याचीही धमकी दिली.
या संपूर्ण घटनेची माहिती करणने घरी येऊन त्याच्या वडिलांना देखील दिली होती. यानंतर वड़िलांनी करणच्या गर्लफ्रेंड आणि मित्राला करणला उकसावण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती. मात्र या धमकीला न घाबरता गर्लफ्रेंडने थेट पिता-पुत्रावर छेड़छाडीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हे एकूण करण आणखीणच घाबरला होता.