Crime : चार मुलांसमोरच बायकोचा दाबला गळा, मरेपर्यंत सोडलंच नाही; कारण…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

husband killed wife in front of children illicit relationship delhi crime news
husband killed wife in front of children illicit relationship delhi crime news
social share
google news

देशात अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढले आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पतीने (Husband) त्याच्या चार मुलांसमोरच बायकोची (Wife killed) गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शबनम असे या मृत महिलेचे नाव आहे. अनैतिक संबंधाच्या (illicit relationship) संशयातून नवऱ्याने हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती आहे. राजधानी दिल्लीत ही घटना घडली आहे. (illicit relationship north east delhi dayalpur police station husband killed wife in front of children delhi crime news )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मंगळवारी मध्यरात्री पोलिसांना कंट्रोल रूमवरून एका घटनेची माहिती देण्यात आली होती. यामध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत तपास सुरु केला होता. यावेळी तपासा दरम्यान माहिती मिळाली की, उमेद नावाच्या व्यक्तीचं बायको शबनम सोबत भांडण झाले होते. या भांडणानंतर उमेदने गळा आवळून शबनमची हत्या केली होती. ज्यावेळेस हा संपूर्ण घटनाक्रम घडला, त्यावेळेस घरात चार मुले देखील उपस्थित होती.

हे ही वाचा : …तर मी नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात टाकेन -प्रकाश आंबेडकर

ईशान्य दिल्लीतील दयालपूर पोलीस स्टेशन हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आरोपी नवरा उमेद (40 वय) पत्नी शबनम (35 वय) आणि चार मुलांसोबत चांद ब्लॉगच्या ई ब्लॉक परिसरात राहत होते. उमेद आणि शबनमचे सात वर्षापुर्वीच लग्न झाले होते. या लग्नापासून त्यांना चार मुले आहेत. उमेद हा कारपेंटरचे काम करायचा.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मंगळवारी मध्यरात्री उमेदचा पत्नी शबनमसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणानंतर चिडलेल्या उमेदने शबनमचा गळा आवळला होता. या घटनेनंतर शबनम बेशुद्ध झाली होती. त्यामुळे तिला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले होते. बायको शबनमचे अनैतिक संबंध असल्याचा संशय उमेदला होता. या संशयातूनच उमेदने शबनमची हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती.

हे ही वाचा : “शिवतीर्थावर अर्धवटरावांनी…”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर

दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी पती उमेदला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT