टक्कल केलं, सिगारेटने जाळलं अन् निर्वस्त्र... अकोल्यात वासनांध तरूणाचे 14 वर्षीय मुलीसोबत क्रूर कृत्य! - in akola shaved head burned with cigarettes and stripped molestation with 14 year old minor girl cause she said no to rape - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

टक्कल केलं, सिगारेटने जाळलं अन् निर्वस्त्र… अकोल्यात वासनांध तरूणाचे 14 वर्षीय मुलीसोबत क्रूर कृत्य!

अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रयत्नात आरोपी तरुणाने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.
Updated At: Nov 21, 2023 09:17 AM
In Akola Shaved head burned with cigarettes and stripped naked molestation with 14-year-old minor girl cause she said no to rape

Maharashtra Crime Case: अकोल्यात (Akola) एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रयत्नात आरोपी तरुणाने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आरोपीने आधी मुलीचा हात सिगारेटने जाळला आणि नंतर तिचे टक्कल करत स्मशानभूमीत निर्वस्त्र करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. माहितीनुसार, ही घटना 15 नोव्हेंबर 2023 रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. (In Akola Shaved head burned with cigarettes and stripped molestation with 14-year-old minor girl cause she said no to rape)

14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

सामाजिक संस्थेच्या लोकांना ही घटना कळताच त्यांनी मुलीच्या वडिलांशी बोलून पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. त्याला 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, आरोपीने त्यांच्या घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती.

वाचा : Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंविरुद्ध दंड थोपटणाऱ्या भुजबळांच्या मागे फडणवीस आहेत का?

मुलीने विरोध करताच तिच्यासोबत अमानुष कृत्य

ही घटना खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैलास टेकडी परिसरात घडली. जिथे आरोपी तरूण एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवण्याचा प्रयत्न करत होता. मुलीने त्याला विरोध सुरू केल्यावर त्याने क्रूर वर्तन करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर पीडितेचे कुटुंब प्रचंड घाबरले आहे.

वाचा : Maharashtra Kesari: शिवराज राक्षे ठरला डबल महाराष्ट्र केसरी, जिंकली ‘ही’ गाडी

न्यायालयाने आरोपीला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

न्यायालयाने आरोपी गनी उर्फ ​​गणेश याला 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, आरोपी अनेकदा त्यांची मुलगी आणि पत्नीला त्रास देत होता. तिने विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे