Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंविरुद्ध दंड थोपटणाऱ्या भुजबळांच्या मागे फडणवीस आहेत का? - maratha reservation politics is devendra fadnavis behind chhagan bhujbal - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंविरुद्ध दंड थोपटणाऱ्या भुजबळांच्या मागे फडणवीस आहेत का?

Maharashtra Political News : छगन भुजबळ हे मनोज जरांगे यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत. पण, देवेंद्र फडणवीस हे भुजबळांच्या आडून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय.
Updated At: Nov 21, 2023 08:28 AM
why chhagan bhujbal so aggressive against manoj jarange

Chhagan Bhujbal Politics Explained : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आणि ओबीसी हा वाद पेटला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी केल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झालेत. जरांगेच्या उपोषणानंतर ठिकठिकाणी ओबीसी नेत्यांनी देखील उपोषण केलं. आता ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

त्यानंतर भुजबळ आक्रमक झालेत आणि जरांगेंना कडाडून विरोध करत आहेत. भुजबळ आणि जरांगेंमधील वाकयुद्ध अवघा महाराष्ट्र बघत आहे. आता भुजबळांच्या मागे फडणवीस असल्याचा आरोप केला जातोय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील भुजबळांच्या मागे फडणवीस असल्याचं ‘मुंबई Tak’शी बोलताना म्हटलं होतं.

भुजबळांच्या मागे नेमकं कोण आहे? भुजबळ जरांगेंना विरोध का करत आहेत? हेच आपण समजावून घेऊयात…

मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून तापला आहे. मनोज जरांगे आरक्षण मिळवून देतील असा विश्वास मराठा समाजाला वाटू लागला आहे. त्यातच जरांगेंच्या सुरुवातीच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्याने मनोज जरांगे प्रसिद्धी झोतात आले. त्यानंतर त्यांनी उपोषणाचं शस्त्र उगारत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली.

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal मनोज जरांगेवर तुटून पडले, 10 जहरी वार

त्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी जरांगेंची मागणी होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंनी मागणी केली.

…अन् भुजबळांकडून जरांगेंना सुरु झाला विरोध

आता ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतचा जीआर देखील काढला आहे. या सगळ्या घडामोडींनंतर भुजबळ आक्रमक झाले. भुजबळांनी मनोज जरांगेंना विरोध करण्यास सुरुवात केली.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी भूमिका भुजबळांनी मांडली. त्याचबरोबर न्यायमूर्तीच जर जरांगेंचं उपोषण सोडवायला जात असतील तर आम्हाला न्याय कसा मिळेल असा सवाल देखील भुजबळांनी उपस्थित केला होता.

हे ही वाचा >> ’तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही…’, भुजबळांनी थेट जरांगेंचं खाणंच काढलं!

सुरुवातीला भुजबळ जरांगेंच्या विरोधात आक्रमक झाले, त्यानंतर इतर ओबीसी नेत्यांनी देखील भुजबळांना साथ दिली. भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवत थेट जालण्यातच सभा घेतली. या सभेत देखील जरांगेंवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.

भुजबळांच्या मागे देवेंद्र फडणवीस?

या सगळ्यानंतर भुजबळांच्या मागे नेमकं कोण आहे असा प्रश्न विचारला जातोय. रोहित पवारांनी मुंबई तकशी बोलताना फडणवीसांनीच भुजबळांना पुढं केल्याचं म्हटलं. त्यामुळे भुजबळांच्या मागे खरंच फडणवीस आहेत का अशी चर्चा सुरु झाली.

ओबीसी हा भाजपचा कोअर वोटर राहिला आहे. ‘जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करे गा’ असं फडणवीस देखील म्हणाले आहेत. त्याचबरोबर एकीकडे जरांगे उपोषण करत असताना फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली होती.

जरांगेंच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जमुळे भाजप आणि फडणवीस बॅकफूटवर गेले होते. त्यात सरकारमधील एक मंत्रीच ओबीसींच्या हक्कांबाबत लढत असल्याने भाजपसाठी ते फायद्याचेच आहे. भाजपला जी भूमिका उघडपणे घेता येत नाही ती भुजबळांच्या मार्फत पुढे केली जात आहे.

ओबीसी विरुद्ध मराठा… काय शिजतंय राजकारण?

दुसरीकडे जालण्यातील सभेत देखील भुजबळांनी पोलिसांची आणि त्या अनुषंगाने एक प्रकारे गृह खात्याची पाठराखण केली. जरांगेंच्या सभेवर लाठीचार्ज केल्याचा आरोप केला जातो परंतु पोलिसांवर या आंदोलनात हल्ला झाला आणि त्यात अनेक महिला पोलीस जखमी झाल्या असा आरोप भुजबळांनी केला. दगडफेक झाल्याने लाठीहल्ला केला अशीच भूमिका फडणवीसांनी सुरुवातीला या प्रकरणावर मांडली होती.

दुसरीकडे ओबीसींच्या सभेला पंकजा मुंडेंना भाजपकडून परवानगी देण्यात आली नाही. भाजपचे इतर नेते जात असल्याने पंकजांनी जाऊ नये असं सांगण्यात आलं. त्यामुळे भुजबळांचं महत्त्व कायम राहावं यासाठी ही रणनीती आखली होती का अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हे ही वाचा >> ‘तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 आमदार पाडू’, कुणी दिला इशारा?

आता भुजबळांना समर्थन देणारे आणि जरांगेंवर टीका करणाऱ्या वडेट्टीवारांनी देखील यु टर्न घेत भुजबळांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही असं म्हटलं. त्याचबरोबर ‘सत्तेतल्या नेत्यांनी समस्या सोडवायच्या असतात मांडायच्या नाहीत’ असं देखील वडेट्टीवार म्हणाले.

त्यामुळे वडेट्टीवारांनी अचानक यु टर्न का घेतला असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे भुजबळ यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे येत्या काळात भुजबळ आपलं आंदोलन अधिक तीव्र करतात की भाजपच्या जवळची भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता भुजबळांना फडणवीसांचा पाठींबा आहे का हे येत्या काळात समोर येऊ शकतं.

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे