Jalgaon: ‘त्या’ नराधमाला गावात आणताच तुफान राडा, चिडलेल्या गावकऱ्यांनी तर.. - Mumbai Tak - jalgaon suspect who raped and murdered a nine year old girl came to the village angry villagers pelted stones crime news - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Jalgaon: ‘त्या’ नराधमाला गावात आणताच तुफान राडा, चिडलेल्या गावकऱ्यांनी तर..

नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्या संशयिताला गावात आल्यावर संतप्त ग्रामस्थांनी आरोपी असलेल्या पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. ज्यामध्ये तीन पोलीस कर्मचारी हे जखमी झाले.
jalgaon suspect who raped and murdered a nine-year-old girl came to the village angry villagers pelted stones crime news

Jalgaon Minor Rape and Muder: मनीष जोग, जळगाव: जळगावमधील (JalgaoN) भडगाव तालुक्यातील गोंडगावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार (Rape) करुन तिची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या गावातीलच 19 वर्षाचा नराधम आहे. ज्याला घटनेच्या दोन दिवसानंतर पोलिसांनी अटक केली. दरम्यान, घटनेसंबंधी चौकशीसाठी आरोपीला गावात आणण्यात आलं तेव्हा संपूर्ण गावकरी तिथे एकवटले आणि त्यांनी तुफान राडा घातला. (jalgaon suspect who raped and murdered a nine-year-old girl came to the village angry villagers pelted stones crime news)

आरोपी समोर दिसताच गावकऱ्यांनी थेट पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक (pelted stones) सुरू केली. मात्र, पोलिसांनी गावकऱ्यांचा उद्रेक वेळीच रोखून धरला. दगडफेकीत तीन पोलीस हे जखमी देखील झाले. मात्र, नंतर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्लानंतर संतप्त गावकरी हे पांगले. मात्र, अद्यापही या गावात तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे.

दरम्यान, पोलिसांनी वेळीच गावकऱ्यांना आवर घातल्याने एक मोठी घटना टळली. अन्यथा आरोपीचा जीव घेण्यासही गावकऱ्यांनी मागे-पुढे पाहिलं नसतं.. एवढा त्यांच्या संतापाचा उद्रेक त्यावेळी झाला होता.

नेमकं काय-काय घडलं?

– भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामधून लपवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील संशयिताला गुरुवारी पोलिसांनी अटक केली आहे.

– स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. मुलीवर लैगिंग अत्याचार केल्यानंतर मुलीशी झालेल्या झटापटीत तरुणाने मुलीच्या डोक्यात दगड टाकला आणि त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून दिल्याची कबूली अटकेतील संशयिताने पोलिसांसमोर दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

– दरम्यान या संशयिताला गुन्हृयाच्या घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी गावात घेवून जात असतांना संशयिताला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन पोलीस जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने जळगाव जिल्हृयात मोठी खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा >> पिंपरी-चिंचवड: रक्ताच्या तहानेने घेतला जीव, दारु पार्टीनंतर मित्राला दगडाने ठेचलं!

– दरम्यान मुलगी मिळून येत नसल्याने मुलीच्या ती बेपत्ता झाल्यासह अपहरणाची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनला केली होती. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयिताच्या अटकेसाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी भडगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन आंदोलन करत अत्यसंस्कार न करण्याचा पावित्रा घेतला होता दरम्यान, दोन दिवसांपासून मृतदेह कडब्याच्या कुट्टीत असल्याने त्यातून दुर्गंधी येवू लागल्याने हा प्रकार १ ऑगस्ट रोजी उघडकीला आला.

-ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील (वय १९, रा. गोंडगाव ता. भडगाव) याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी स्वप्निल याला अटक केली. ३० जुलै रोजी दुपारी सदर मुलीला आमिष दाखवून संशयिताने त्याच्या गोठ्यात तिला बोलाविले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर प्रकरण उघड होऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर दगड मारून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह त्याने गोठ्यातील कडब्याच्या कुट्टीखाली लपवून ठेवला होता. अशी कबूली संशयिताने पोलिसांना दिली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

– संशयित स्वप्नील विनोद पाटील याला अटक केली असून त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी संशयित याला ५५ ते ६० पोलीस बंदोबस्तात घटनास्थळाच्या पडताळणी जात गोंडगाव येथे नेत असतांना, संशयितास आमच्या हवाली करा म्हणत ग्रामस्थांनी गोंधळ घातला. यात संशयिताला ताब्यात घेण्यावरुन पोलीस आणि जमावात झालेल्या वादातून पोलिसांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीत ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच वाहनाचेही मोठे नुकसान झाले

हे ही वाचा >> Crime: ‘या’ दोन मुलींच्या हत्येने महाराष्ट्र हादरला, अंगावर काटा आणणारी कहाणी

– जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली. असून गोंडगावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला भडगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.

– भडगाव येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात दाखल गुन्ह्यात खूनाचे कलम वाढविण्यात आले आहे. मेडीकल तपासणी सुध्दा झाली आहे, वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अहवालानंतर आणखी कलम वाढविण्यात येतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी बोलतांना दिली आहे.

Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat!