पुण्यात स्विगी बॉयवर चाकू हल्ला, बिर्याणी पार्सलचे पैसे मागितल्यानंतर घडला प्रकार

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आपल्याला चमचमीत किंवा आपल्या आवडीचं खायचं असेल तर हल्ली हॉटेलच गाठावं लागतं असं काही नाही. स्विगी किंवा झोमॅटो असे ऑनलाईन जेवण किंवा खायचं मागवण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत. अशात पुण्यात एका स्विगी बॉयवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

नेमकी काय घडली पुण्यातली घटना?

स्विगी ही ऑनलाईन डिलिव्हरी देणारी कंपनी असून याच कंपनीकडे पुण्यातील सिंहगड परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने ऑनलाईन बिर्याणी ऑर्डर केली.त्यानंतर संबधित डिलिव्हरी बॉय बिर्याणी घेऊन गेला.पण त्याला त्याचे पैसे न देता, त्याच्यावर चाकू हल्ला केला.यामध्ये डिलिव्हरी बॉय जखमी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी सिंहगड पोलिसांकडे संबधित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत काय माहिती दिली आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक कीर्तीनगर येथील पीएमपीएमएल बस स्टॉप परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन आरोपी मुलाने मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास स्विगीवर ऑनलाईन बिर्याणी ऑर्डर केली. ती ऑर्डर गणेश केशव पवार हे तीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी घेऊन पोहोचले. फिर्यादी गणेश यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली असता,जवळ असलेल्या चाकूने त्यांच्यावर हल्ला केला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यामध्ये फिर्यादी केशव हे जखमी झाले.त्यानंतर फिर्यादी केशव यांनी आमच्याकडे तक्रार देताच,आरोपीला काही तासात शोधून काढण्यात यश आले आहे.त्या आरोपीला न्यायालयामध्ये हजर केल्यावर त्यास बालसुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.तसेच 16 वर्षीय अल्पवयीन आरोपी हा व्यसनाधीन असून त्यातून त्याने हे केले असावे, अशी माहिती सिंहगड पोलिसांनी सांगितली.

ज्या सोळा वर्षांच्या मुलाने या स्विगी डिलिव्हरी बॉयवर चाकू हल्ला केला त्या मुलाला व्यसनं आहेत. व्यसनांच्या नशेतूनच त्याने हे पाऊल उचललं असावं असंही समोर येतं आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्या मुलाचं नाव सांगितलेलं नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT