अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणारी ठाण्यातील ती महिला कोण?
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. ही महिला ठाणे शहरातील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवरून वेगवेगळ्या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका महिलेला अटक केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी ही कारवाई केली. […]
ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. ही महिला ठाणे शहरातील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवरून वेगवेगळ्या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका महिलेला अटक केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी ही कारवाई केली.
अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणारी ही महिला ठाण्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आहे. ती सातत्याने अमृता फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवरून आक्षेपार्ह पोस्ट करत होती. या प्रकरणी तक्रार पोलिसांना मिळाली होती. गुन्हा दाखल करून पोलिसांनी सदरील महिलेला अटक केली.
अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणारी महिला कोण?
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अमृता फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या महिलेचं नाव स्मृती पांचाळ असं आहे. ती मागील दोन वर्षांपासून अमृता फडणवीस यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर आक्षेपार्ह कमेंट्स करत होती, अशी माहिती समोर आलीये.