अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मा यांच्याविषयीच्या पोस्टमुळेच,पोलिसांची माहिती
अमरावतीचे व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांविषय़ी समर्थन करणारी पोस्ट केल्यानेच झाली. ही माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साली यांनी दिली आहे. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सहा आरोपींना अटक […]
ADVERTISEMENT

अमरावतीचे व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांविषय़ी समर्थन करणारी पोस्ट केल्यानेच झाली. ही माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साली यांनी दिली आहे. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.
पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यात प्रथमदर्शनी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा देत जी पोस्ट केली होती त्यातूनच त्यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
राजस्थानच्या उदयपूरमध्ये जी कन्हैय्या शर्माच्या हत्येची घटना समोर आली तशीच घटना महाराष्ट्रातल्या अमरावतीत झाली आहे. मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी चायनीज सुरा मारून केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.










