Crime: मुलींनी सिगारेट ओढणं आवडलं नाही, वृद्धाने एका मिनिटात…

रोहित गोळे

ADVERTISEMENT

old man did not like girls smoking cigarettes openly set fire to the cafe crime news indore
old man did not like girls smoking cigarettes openly set fire to the cafe crime news indore
social share
google news

Crime News Indore: इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून (Indore) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका वृद्ध व्यक्तीला मुलींनी सिगारेट (Cigarettes) ओढणं अजिबात आवडलं नाही. ज्यामुळे या वृद्ध व्यक्तीने थेट कॅफेमध्ये घुसून तिथे आग लावली. कारण याच कॅफेत मुली सिगारेट ओढत असत. हीच गोष्ट पचनी न पडल्याने या वृद्ध व्यक्तीने अत्यंत विचित्र पाऊल उचललं. जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वृद्धाची ही घटना कैद झाली आहे. (old man did not like girls smoking cigarettes openly set fire to the cafe crime news indore)

सुमारे तीन ते चार लाख रुपयांचा माल जळून खाक झाल्याचे कॅफे ऑपरेटर शुभम चौधरी यांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लासुदिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्काय कॉर्पोरेटजवळ हा कॅफे आहे. जिथे मध्यरात्री कॅफेमध्ये आग लावण्यात आली होती.

हे ही वाचा>> Ajit Pawar: ‘ते म्हणाले, मॅडम, तुम्ही यात पडू नका..’, मीरा बोरवणकरांचा आणखी मोठा गौप्यस्फोट

मुलींनी सिगारेट ओढल्याने संतापलेल्या वृद्धाने कॅफेला लावली आग

कॅफे ऑपरेटरने सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा एक वृद्ध व्यक्ती आग लागून निघून जात असल्याचे दिसले. पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी तरेस सोनी यांनी त्यांच्या पथकासह आरोपी वृद्धाला अटक केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी आरोपी वृद्धाला अटक केली

चौकशीत वृद्धाने पोलिसांना सांगितले की, मुली कॅफेमध्ये उभ्या राहून सिगारेट ओढत असत. त्याला हे सर्व आवडले नाही. त्यामुळे त्याने कॅफेला आग लावली. विजय माथे (वय 70 वर्ष) असे आरोपी वृद्धाचे नाव असून तो अनेक दिवसांपासून कॅफेमध्ये फिरत होता. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 436 (इमारत जाळण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थाचा दुर्भावनापूर्ण वापर) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा>> Honey Trap: तरुणांसोबत अश्लील Video कॉल, चपलेचा हार घालून महिलेला फिरवलं गावभर

मुलींनी सिगारेट ओढू नये या मानसिकेतेतून वृद्धाने केलेल्या या कृत्याचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT