Palghar Crime : जादूटोणा... महिलेवर पतीच्याच 5 मित्रांनी केला अनेक वेळा बलात्कार - Mumbai Tak - palghar women rape by husband friend black magic rituals superstition five arrested - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Palghar Crime : जादूटोणा… महिलेवर पतीच्याच 5 मित्रांनी केला अनेक वेळा बलात्कार

पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नवऱ्याच्याच मित्रांनी मिळून महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. घरावरील वास्तू दोष आणि संकट दुर करण्याचा बहाण्याने आरोपींनी महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे.
palghar women rapeb by husband friend black magic rituals five arrested

पालघरमधून (Palghar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नवऱ्याच्याच मित्रांनी मिळून महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. घरावरील वास्तू दोष आणि संकट दुर करण्याचा बहाण्याने आरोपींनी महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. याप्रकरणी आता महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे हे सर्व आरोपी हे महिलेच्या पतीचे मित्र आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. (palghar women rapeb by husband friend black magic rituals five arrested)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपींनी महिलेला तिच्या घरावर आणि पतीवर कुणीतरी काळी जादू केल्याचे सांगितले होते. या काळ्या जादूमुळेच महिलेच्या घरावर अनेक संकट येत होती. त्यामुळे या संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी आरोपींनी महिलेला काही उपाय आणि विधी सांगितल्या होत्या. हे उपाय करण्यासाठी आरोपींनी एप्रिल 2018 पासून महिलेच्या घरी जायला सुरुवात केली होती.

हे ही वाचा : NCP Crisis : ‘…मग आम्ही कोण?’ छगन भुजबळांनी केली शरद पवारांची कोंडी, थेटच बोलले

महिला ज्यावेळेस घरी एकटी असायची त्यावेळेस आरोपी घरात येऊन काळी जादू दर करण्याचा बहाणा करायचे. या दरम्यान आरोपी महिलेला पंचामृतच्या नावाखाली गुंगीचे औषध पाजायचे. त्यानंतर महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार करायचे. हा सर्व घटनाक्रम वारंवार सुरु होता.

आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी नवऱ्याला सरकारी नोकरी लागण्यासाठी आणि घरात शांती आणि समृद्धी नांदण्यासाठी महिलेकडून तंत्र मंत्र करण्यासाठी सोन्याचे दागिने आणि पैसे देखील घेतले होते. यानंतर 2019 मध्ये आरोपींनी ठाण्याच्या येऊर जंगलात आणि कांदिवलीच्या मुख्य आरोपीच्या ठिकाणी आणि लोणावळ्याच्या एका रिसॉर्ट, असा अनेक ठिकाणी बोलावून महिसलेवर बलात्कार केला होता. आरोपींनी साधारण तंत्र मंत्रच्या नावाखाली महिलेकडून 2.10 लाख आणि दागिने घेतले होते.

हे ही वाचा : लग्नानंतर कळलं पती तर…, शेकडो प्रयत्न करूनही वाचवता आला नाही संसार!

या प्रकरणात महिलेला आपली फसवणूक होत असल्याचे कळताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत रवींद्र भाटे, दिलीप गायकवाड, गौरव साळवी, महेंद्र कुमावत आणि गणेश कदमला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

याप्रकरणी पाच आरोपींनी असे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे, असे तलासरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय मुतडक यांनी सांगितले आहे. तसेच पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, पाच आरोपींविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया