प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक Avinash Bhosle ना सीबीआयने केली अटक

दिव्येश सिंह

पुण्यातले प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. DFHL प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात अविनाश भोसले यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएफएचएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे-मुंबई या ठिकाणी छापे मारले होते अखेर आज अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. Avinash Bhosle यांना ED […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुण्यातले प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. DFHL प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात अविनाश भोसले यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएफएचएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे-मुंबई या ठिकाणी छापे मारले होते अखेर आज अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

Avinash Bhosle यांना ED चा दणका, पुण्यातील 4 कोटींची मालमत्ता जप्त

एप्रिल महिन्यात अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातल्या एकूण ८ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती.

ईडीनं गेल्यावर्षी अविनाश भोसले यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली होती. अविनाश भोसले यांच्या व्यावसायिक भागीदारांवर देखील छापे टाकण्यात आले होते. डीएचएफल येस बँक लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयनं ही कारवाई केली आहे. सीबीआयनं अटकेची कारवाई करण्यापूर्वी ३० एप्रिल रोजी छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या वर्षी ते ईडीच्या रडारवर होते. त्यांचा मुलगाही या प्रकरणी ईडीच्या रडारवर होता. आता सीबीआयने त्यांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp