सांगलीतील 'त्या' ९ जणांची 'हत्या'; गुप्तधनाच्या अमिषाने घडलं 'हत्याकांड'

सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ येथे 20 जून रोजी झालेल्या दुर्दैवी नऊ जणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
Sangali Family Murder Case
Sangali Family Murder CaseMumbai Tak

स्वाती चिखलीकर

सांगली: सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ येथे 20 जून रोजी झालेल्या दुर्दैवी नऊ जणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. गुप्तधनाच्या अमिषाने हे हत्याकांड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी 2 संशयितांना सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. या दोघांनीच काही तरी विषारी वस्तू खायला दिल्याने या हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी धीरज चंद्रकांत सुरवशे, अब्बास महंमदअली बागवान या दोघांना अटक करण्यात आली आहे. (Sangli Family Murder Case)

उद्या या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. या प्रकरणी यापूर्वीच 25 जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी 19 जणांना आजपर्यंत अटक करण्यात आली आहे. मयत डॉ . माणिक वनमोरे , आणि पोपट वनमोरे यांच्या गुप्तधनाच्या अनुषंगाने काही व्यक्तींसोबत रात्री भेटी गाठी होत होत्या. त्यांची तांत्रिक माहिती पोलिसांना मिळाली होती त्याआधारे तपास करून वरील दोन आरोपींना सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे. आणि पुढील तपास सुरू आहे.

नेमकी घटना काय?

सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली अशी बातमी समोर आली होती. विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

आत्महत्या कलेल्या मयतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) आदींचा समावेश होता.

नरवाड रोड अंबिका नगर आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह घरात आढळून आले होते. हे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेले माणिक वनमोरे हे पेशाने डॉक्टर होते तर पोपट वनमोरे हे शिक्षक आहेत, अशा सुशिक्षीत कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in