तुरुंगातच घेतला गळफास, पोलिसांना सुसाईड नोटसोबत सापडला मुलीचा फोटो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Suicide in jail : छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात तुरुंगातील एका कैद्याने गळफास लावून आत्महत्या केली. या कैद्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता, ज्यामध्ये त्याला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. कारागृहात रविवारी सायंकाळी त्याने हे आत्महत्येचे पाऊल उचलले. (Saying ‘love is not one-sided’, the young man who was serving the sentence hanged himself in jail)

IAS अधिकाऱ्याच्या आजी-आजोबांची आत्महत्या, काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट

पोलिसांना मृताकडून मुलीचा फोटो आणि सुसाईड नोटही मिळाली आहे. हे प्रकरण सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कारागृहात राहणाऱ्या अंडरट्रायल कैद्यांवर विशेष नजर ठेवण्यात आली आहे. असे असतानाही या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कारागृह प्रशासनाला सुगावाही लागला नाही. या आत्महत्येप्रकरणी मृताच्या मोठ्या भावाने न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, 25 मार्च 2022 रोजी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी त्यांची मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर 8 एप्रिल 2022 रोजी पोलिसांना ती मुलगी सापडली. मुलीने सांगितले की, खैरा गावात राहणाऱ्या 24 वर्षीय बनवारी कश्यपने लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

धाराशिव : बलात्काराच्या आरोपीने जामिनावर सुटताच पुन्हा त्याच चिमुकलीवर केला अत्याचार

तुरुंगात फाशी लावून घेतली

मुलीच्या जबानीवरून पोलिसांनी बनवारीला अटक केली. हे प्रकरण न्यायालयात गेले आणि 5 एप्रिल 2023 रोजी जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश खिलावन राम रिग्री यांनी आरोपी तरुणाला 20 वर्षांची शिक्षा सुनावली. तेव्हापासून हा तरुण तुरुंगात होता. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा कारागृहात बनवारीने कारागृहाच्या खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली.

ADVERTISEMENT

रविवारी सकाळी पोलिसांनी कैद्यांची मोजणी सुरू केली असता त्यांना एक कैदी कमी असल्याचे दिसून आले. कारागृहात झडती घेतली असता बनवारीचा मृतदेह खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कारागृह प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि एसडीएम तेथे पोहोचले.

ADVERTISEMENT

मुलीवर लावले आरोप

पोलिसांना सुसाईड नोट आणि तरुणीचा फोटो सापडला आहे . कैद्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, “मी जितका दोषी आहे, तितकीच तू आहेस, प्रेम हे एकतर्फी नसते.” पोलिसांनी ही सुसाईड नोट आपल्या ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

कैद्याला बिलासपूर कारागृहात पाठवण्याची तयारी केली होती – जेलर

या संदर्भात जेलर जे.एल.मेश्राम यांनी सांगितले की, कारागृह रक्षक आणि मृताच्या बॅरेकमधील कैद्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. जेलरने पुढे सांगितले की, मृत कैद्याला बिलासपूर कारागृहात पाठवण्याची तयारी सुरू होती. मात्र त्यापूर्वीच ही घटना घडली.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मोठ्या भावाने केली

दुसरीकडे बनवारीच्या आत्महत्येनंतर तिचा मोठा भाऊ चैत्राम कश्यपने सांगितले की, 5 एप्रिल रोजी जेव्हा त्याच्या भावाला शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा तो सुखरूप होता. त्याला जिल्हा कारागृहात आणल्याची माहिती फोनवरून मिळाली होती. कैद्यांसाठी कारागृह हे सुरक्षित ठिकाण असताना त्याच्या भावाने असे पाऊल कसे उचलले, असे चैत्राम म्हणाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मृताच्या भावाने केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT