नागपूर : 1 कोटींच्या लाचेची मागणी; MIDC चा टेक्नीशियन लाचलुचपतच्या जाळ्यात, आमदाराचही नाव
25 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अमरावती MIDC चे टेक्नीशियन अटकेत
ADVERTISEMENT
Crime News :
ADVERTISEMENT
नागपूर : कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या 2 तक्रारीमधील चौकशी थांबवण्यासाठी 25 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अमरावती MIDC चे टेक्नीशियन दिलीप वामनराव खोडे (50) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. याशिवाय शेखर भोयर या अमरावतीमधील या एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एका आमदाराचंही नाव आल्याने खळबळ उडाली आहे. (Technician of Amravati MIDC arrested in 1 crore bribe demand)
याबाबत नागपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्याविरुद्ध विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्झा यांच्याकडे तक्रारदार यांच्या विभागातील महिला अधिकारी यांनी तक्रार केली होती. मात्र या तक्रारीमध्ये विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित न करणे आणि तक्रारीवर कोणतीही कारवाई न होता परस्पर मिटविण्याकरिता आरोपी दिलीप वामनराव खोडे यांनी 2 केसेसचे प्रत्येकी 50 लाख अशा एकूण 1 कोटी रुपयांची मागणी केली.
हे वाचलं का?
यानंतर दिनांक 28 मार्च रोजी तक्रारदारास तडजोडी अंती 25 लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर दिलीप वामनराव खोडे यांना पंचासमक्ष ही रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT