Mumbai Crime : …अन् 14 वर्षाच्या मुलीवर टॅक्सीमध्ये केला बलात्कार
मुंबईमध्ये एका १४ वर्षाच्या मुलीवर धावत्या टॅक्सीमध्ये बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात टॅक्सी चालकासह मुख्य आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Crime news in Marathi : घरच्यांसोबत भांडण झालं. वादानंतर ती रागातच घरातून बाहेर पडली. नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाली, पण नंतर जे घडलं ते भयानक होतं. नातेवाईकांकडे निघालेल्या 14 वर्षाच्या मुलीवर दोन नराधमांनी टॅक्सीमध्ये बलात्कार केला. ही संतापजनक घटना मालवणी भागात घडली. (14 year old girl raped in moving taxi in mumbai. police arrested two accused.)
ADVERTISEMENT
मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सलमान शेख (वय 26 ) असं मुख्य आरोपीचं नाव आहे. प्रकाश पांडे नावाच्या टॅक्सी चालकालाही पोलिसांनी अटक केली आहे. टॅक्सी चालकाने आरोपीची मदत केल्याचा आरोप आहे.
घरच्यांसोबत वाद अन् घराबाहेर पडली
18 सप्टेंबर रोजी 14 वर्षीय मुलीचं घरच्यांसोबत भांडण झालं. त्यामुळे रागात तिने घर सोडलं. घरातून बाहेर पडल्यानंतर ती मालवणी राहणाऱ्या तिच्या नातेवाईकांकडे निघाली होती. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> महिला आरक्षण कायदा खरंच 2024 मध्ये लागू होईल का?
टॅक्सीत बसली नंतर…
मालवणीत जाण्यासाठी पीडित मुलगी टॅक्सीमध्ये बसली. चालकाने दादरमधून त्याच्या ओळखीच्या सलमान शेख याला टॅक्सीमध्ये बसवलं. त्यानंतर दादर ते सांताक्रुझ दरम्यान सलमान शेख याने अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला.
टॅक्सीमध्ये बलात्कार केल्यानंतर दोघांनी मुलीला मालवणी भागात सोडून दिले. त्यानंतर पीडित मुलगी मालवणीतील तिच्या नातेवाईकाच्या घरी गेली. तिने नातेवाईकांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Women Reservation : 5 कारणं… जी सांगतात महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण का आवश्यक?
पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा शोध सुरू केला. दोन तासांतच पोलिसांनी आरोपींना अटक केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT