प्रेयसीचे दुसऱ्यावर जडलं प्रेम, नंतर…; बॉयफ्रेंडच्या कृत्याने चिंचवड हादरलं!
पिंपरी चिंचवडमध्ये 17 वर्षीय मुलीची बॉयफ्रेंडने हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT
पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. 1 एप्रिल रोजी रात्री घरातून निघून गेलेल्या एका 17 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. मुलीच्या मृत्यूचं कारण उलगडलं असून, तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी तिच्या बॉयफ्रेंडला आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
गुन्हेगारी घटनामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एका प्रियकराने प्रेयसीची कोयत्याने वार करून हत्या केल्याचं समोर आलं आहे.
चिंचवडमध्ये अफेअरमुळे प्रेयसीला संपवलं, घटना नेमकी काय?
1 एप्रिल रोजी रात्री घरातून निघून गेलेल्या एका अल्पवीयन मुलीचा मृतदेह 4 एप्रिल रोजी आढळून आल्याने खळबळ माजली होती. महत्त्वाचं म्हणजे 17 वर्षीय मयत मुलीच्या शरीरावर ठिकठिकाणी कोयत्याने वार करण्यात आलेले होते.
हे वाचलं का?
हेही वाचा – लग्नासाठी मुलगी बघायला आलेला तरूण, होणाऱ्या सासूलाच नेलं पळवून!
अल्पवयीन मुलगी 1 एप्रिल रोजी घरातून निघून गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयानी 2 एप्रिल रोजी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मुलगी बेपत्ता झाल्याचं प्रकरण समजल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली.
बेपत्ता झालेल्या मुलीला शोध घेत असताना 4 एप्रिल रोजी एक मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटवण्यात आल्यानंतर तो घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचाच असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला.
ADVERTISEMENT
बॉयफ्रेंडने मित्राच्या मदतीने केली हत्या, पोलीस तपासात कळलं कारण
पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आलं की, तिची हत्या करण्यात आली आहे आणि दोन अल्पवयीन मुलांनीच तिची हत्या केली. हत्या करणाऱ्या दोघांपैकी एका अल्पवयीन मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली होती. त्यात आधीच तिच्याशी असणाऱ्या प्रेमसंबधातून त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हाही दाखल झाला होता. याच रागातून त्याने मित्राच्या मदतीने हे कृत्य केलं.
ADVERTISEMENT
हेही वाचा – दोन नवऱ्यांसोबत खुश… तरीही महिलेला करायचंय तिसरं लग्न, कारण ऐकून बसेल धक्का!
दरम्यान, मुलीची हत्या करणारे दोन्ही आरोपी अल्पवयीन असलेल्या चिखली पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. मृत मुलीच्या आईने हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT