Crime News: 70 वर्षाच्या महिलेला घरी बोलावलं, बलात्कार करुन हत्या.. दोन दिवस मृतदेहसोबत काय करत होता आरोपी?
Old Women Rape And Murder : महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं देशभरात संताप पसरला असतानाच लातूरमध्येही खळबळजनक घटना घडली. एका इसमाने ७० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार करुन हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दोन दिवस त्या महिलेच्या मृतदेहासोबत राहिला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लातूरमध्ये बलात्कार आणि हत्येची धक्कादायक घटना घडली
आरोपी महिलेच्या मृतदेहासोबत घरातच दोन दिवस राहिला
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी केलं असं काही...
Old Women Rape And Murder : महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं देशभरात संताप पसरला असतानाच लातूरमध्येही खळबळजनक घटना घडली. एका इसमाने ७० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार करुन हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दोन दिवस त्या महिलेच्या मृतदेहासोबत राहिला. शेजाऱ्यांना या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेली माहिती अशी की, औसा तहसीलच्या भेटा परिसरात राहणाऱ्या मंसूर शेखच्या घरी दुर्गंधी पसरली होती. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. त्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेबद्दल पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी पोलिसांना एका वृद्ध महिलेचा मृतदेह मिळाला. त्या मृतदेहाजवळ मंसूर शेख बसला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेऊन आरोपी मंसूर शेखला अटक केली.
आरोपी मृतदेहासोबत दोन दिवस घरातच राहिला अन्...
महिलेवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा गळा दाबला. दोन दिवसानंतर मृतदेहाला दुर्गंधी येत होती. या महिलेसोबत बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. शेख दोन दिवस मृतदेहासोबत राहिला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
महिला भेटापासून दहा किमी अंतरावर असलेल्या बोरगाव इथे राहत होती. महिला मागील काही दिवसांपासून गावातच राहत होती. आरोपी पत्नी आणि आईचं निधन झाल्यानंतर एकटा राहत होता. याचाच फायदा घेत आरोपी शेखने महिलेला घरी आणलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करुन हत्या केली. आरोपी मानसिकरित्या अस्थिर आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
ADVERTISEMENT