Rupal ogre :संबंधास नकार दिल्याने…, एअर होस्टेस हत्याकांडात मोठा खुलासा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

air hostes rupal ogre murder case pawai police arrested society cleaning staff
air hostes rupal ogre murder case pawai police arrested society cleaning staff
social share
google news

Mumbai Air Hostess Rupal Ogre Murder: मुंबईतील ट्रेनी एअर होस्टेस रूपल ओग्रे (Rupal Ogre) हत्याकांडात आता पोलिसांनी तिच्याच सोसासटीच्या एका सफाई कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. विक्रम अटवाल (40) असे या आरोपीचे नाव आहे. या सफाई कर्मचाऱ्याने रूपल ओग्रेची हत्या का केली? रूपल ओग्रे आणि सफाई कर्मचाऱ्यामध्ये नेमकं काय होतं? असे सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे. (air hostes rupal ogre murder case pawai police arrested society cleaning staff)

ADVERTISEMENT

रूपल ओग्रे मुळची छत्तीसगढची असून एअर इंडियाच्या एअर होस्टेस प्रशिक्षणासाठी मुंबईत आली होती.रूपल तिची बहिण व बहिणीच्या मित्रासोबत मरोळमध्ये राहत होती. आठ दिवसांपूर्वीच रूपलची बहिण आणि तिचा मित्र घरी गेला होता त्यामुळे रूपल घरी एकटीच होती.

हे ही वाचा : Maratha Morcha : ‘माझी अंतयात्रा तरी निघेल नाहीतर मराठा समाजाला…’, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

दरम्यान हत्येपुर्वी रविवारी रूपल ओग्रेने आरोपी विक्रम अटवालला घरी बोलावले होते. बाथरूमचा चॉरअप झालेला पाईप साफ करण्याची तिने विक्रमला बोलावले होते. यावेळी रूपल घरी एकटी असल्याचे पाहून विक्रमने संधी साधत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. यावर रूपल ओग्रेने त्याला नकार दिला. त्यामुळे रूपल आणि विक्रममध्ये कडाक्याचे भांडण होऊन वाद झाला. या वादातूनच विक्रमने चाकूने गळा चिरून तिची हत्या केली.

हे वाचलं का?

या हत्येपुर्वीच तिचे कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले होते. त्यानंतर तिला पुन्हा एकदा फोन केल्यानंतर तिने उचलला नसल्याने कुटुंबाला चिंता वाटत होती. त्यामुळे रूपलच्या मित्रांद्वारे चौकशी केली असता ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. तसेच घटनास्थळाची सीसीटीव्ही तपासली होती. त्याचबरोबर सोसायटीत काम करणाऱ्या चारही सफाई कर्मचाऱ्यांना चौकशीला बोलावले होते. त्यावेळी आरोपी विक्रमच्या शऱीरावर नखांच्या खुणा दिसल्या होत्या. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर विक्रमने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Chandrayaan 3 : चंद्रावर चालण्याचा फील! ISRO ने शेअर केले विक्रम लँडरचा रंगीत फोटो

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानुसार हत्येच्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींची चौकशी आम्ही करत आहोत.आरोपींचा जबाब,तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे यांच्या मदतीने गुन्ह्यामागचा मुळ उद्देश काय आहे, हे लवकरच समोर येईल असे परिमंडळ 10 चे पोलीस आयुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT