महिलेवर बलात्कार अन् दगडाने ठेचून हत्या; मृतदेह वाशीमच्या रेल्वे स्टेशनजवळ फेकला
Washim Crime News : महिलेचे डोके मोठ्या दगडाने ठेचलेले असल्याने हा हत्या प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला. तसेच मृतदेहावरील कपडे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळल्याने महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेवर बलात्कार अन् दगडाने ठेचून हत्या
मृतदेह वाशीमच्या रेल्वे स्टेशनजवळ फेकला
Washim Crime News, जका खान: वाशिम जिल्ह्यातील रेल्वे स्थानक परिसरात आढळलेल्या अनोळखी महिलेच्या निर्घृण हत्येचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला असून या प्रकरणातील आरोपीला अकोला रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली आहे. या घटनेत आरोपीने आधी बलात्कार करून नंतर महिलेची हत्या केल्याची कबुली दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
आधी अत्याचार केले अन् नंतर दगडाने ठेचून हत्या
अधिकची माहिती अशी की, शुक्रवारी (दि.9) दुपारी वाशिम रेल्वे स्थानक परिसरात एका ट्रकजवळ महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस आणि रेल्वे पोलिसांची संयुक्त टीम घटनास्थळी दाखल झाली. मृतदेहाची पाहणी केली असता सदर महिलेचे वय अंदाजे 45 ते 50 वर्षांच्या दरम्यान असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
महिलेचे डोके मोठ्या दगडाने ठेचलेले असल्याने ही हत्याच झाल्याचे पोलिसांना लगेच समजले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला होता. तसेच मृतदेहावरील कपडे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळल्याने महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
हेही वाचा : उद्धव ठाकरे म्हणाले, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांचं जोरदार प्रत्युत्तर










