भयंकर! एका रात्रीत संपवलं अख्खं कुटुंब, हत्याकांडाचं हादरवून टाकणारं कारण
अमेरिकेतील एका छोट्याशा गावातील हसतं खेळत्या कुटुंबातील एका मुलाने आपल्याच घरातील आई वडिलासंह भावंडांनाही संपवल्याची घटना घडली होती. त्यानंतर आपल्या कुटुंबाला आपण का संपवलं त्याची त्याने घटनाक्रमच सांगितला.
ADVERTISEMENT
Family Murder: अमेरिकेतील (America) अलाबामामध्ये एल्कमॉन्ट नावाचे एक छोटेसे शहर आहे. या छोट्या शहराची लोकसंख्याही केवळ 500 आहे. मात्र हे प्रकरण आहे 2019 मधील. एल्कमॉन्टमधील एका कुटुंबामध्ये एक शांत मुलगा (Son) होता. त्याचे वय होते 14 वर्षे, तर नाव हते मेसन सिस्क. तो, त्याचे 38 वर्षीय वडील जॉन आणि 35 वर्षीय सावत्र आई मेरीसोबत राहत होता. तर त्याला 3 सावत्र भाऊ (Brother) आणि बहिणीही (Sister) होत्या. त्यामध्ये एक 6 वर्षाची मुलगी, 4 वर्षाचा मुलगा आणि 6 महिन्याच्या मुलाचा समावेश होता. तर जॉन एका कार डीलरशिपमध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होते. त्याआधी हेअर स्टायलिस्ट म्हणून तो काम करत होता. त्याला मोटार सायकलचीही प्रचंड आवड होती.
ADVERTISEMENT
नात्यात भेदभाव नाही
मिरर यूकेच्या अहवालानुसार मेरी एक स्पेशल शिक्षिका होती. त्याच बरोबर ती पीएचडीही करत होती. मेसन सिस्कची ती जन्मदात्री आई नव्हती मात्र त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षापासून मेरीने त्याच्याबरोबर घराची काळजी घेतली होती. मेरीने आपली मुले आणि आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या पत्नीची मुले यांच्यामध्ये कधी भेदभाव केला नाही. हे असं सुखी कुटुंबांचं चित्र असलं तरी काही दिवसांनी मात्र या हसत्या खेळत्या कुटुंबामध्ये एक विचित्र घटना घडली, आणि भयंकर घटना घडली. कारण काही दिवस गेले आणि मेसन सिस्क हा आपल्या कुटुंबाबरोबर विचित्र वागू लागला.
स्वतःच केला पोलिसांना फोन
मेसन सिस्क हा 2 सप्टेंबर रोजी आपल्या कुटुंबासह फ्लोरिडाहून परतला. फ्लोरिडाला तो एका ओळखीच्या व्यक्तीला तिथे भेटण्यासाठी गेला होता. प्रवास करुन आल्यामुळे ती सगळी थकून गेली होती. त्यामुळे त्या रात्री ती सगळी आपापल्या खोलीमध्ये लवकर झोपायला गेली. त्याच रात्री सिस्कने एका आपत्कालीन क्रमांकावर त्याने कॉल केला होता. तेव्हा रात्रीचे 11 वाजून गेले होते. त्यावेळी त्याने सांगितले की, घरावर गोळीबार झाला आहे. त्यानंतर जेव्हा अधिकारी आले तेव्हा त्यांना सिस्क रस्त्यावर त्यांची वाट पाहत असल्याचे त्यांना दिसून आले. पोलीस आल्यानंतर त्याने सांगितले की, तो तळघरात व्हिडीओ गेम खेळत होता, त्यावेळी गोळीबाराचा आवाज आला, त्यानंतर त्याने घराबाहेर येऊन पाहिले तेव्हा कोणीतरी वाहनातून निघून गेल्याचेही त्याने सांगितले.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> लक्ष्मी पूजन करत होती AAP ची महिला नेता, तेव्हाच पतीने झाडल्या गोळ्या!
झोपल्या जगीच संपवलं
जेव्हा पोलिस अधिकारी घरात गेले तेव्हा त्यांना जॉन, मेरी आणि त्यांची तीन मुले त्यांना आढळून आली. त्या सर्वांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. तेही ते सगळे आपापल्या पलंगावर झोपलेले असताना. यामध्ये 4 वर्षांचा मुलगा आणि जॉन फक्त गंभीर जखमी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचाही नंतर मृत्यू झाला. मेरी आणि तिचा 6 महिन्यांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगीलाही मृत घोषित करण्यात आली. मात्र घरात घुसून संपूर्ण कुटुंबाला का संपवण्यात आले तेच कोणाला समजत नव्हते.
पोलिसांचा संशय बळावला
पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर मात्र त्यांना एक प्रश्न पडला की, गोळीबारातून एकटा सिस्क कसा वाचला. त्यामुळे त्याचाही पोलिसांना संशय येऊ लागला. त्यानंतर एका अधिकाऱ्याने सिस्कबद्दल संशय वाटू लागल्याचे सांगितल्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले. मात्र त्यावेळी त्याने त्यांच्या मृत्यूला आपण जबाबदार नसल्याचे सांगत पोलिसांचं मत ठामपणे नाकारले.
ADVERTISEMENT
शस्त्र दिलं शोधून
पोलीस स्टेशनमध्ये त्याचा काही वेळ निघून गेल्यानंतर मात्र त्याने घटनाक्रम सांगायला सुरुवात केली. सिस्क म्हणाला की त्यानेच बंदुकीचा ट्रिगर ओढला आणि सगळ्यांना संपवलं. त्या घटनेनंतर रस्त्यावर फेकलेले शस्त्र शोधण्यातही त्याने अधिकाऱ्यांना त्यासाठी मदत केली. फ्लोरिडा दौऱ्यादरम्यान त्याने ही 9 एमएम बंदूक चोरुन आणली होती. त्याने 6 महिन्यांच्या मुलाला सोडून सगळ्यांना गोळ्या घातल्या होत्या.
ADVERTISEMENT
पुन्हा कुटुंबाची आठवण नाही
त्याने घटनाक्रम सांगितल्यानंतर सिस्कला विचारण्यात आले की, तू असं का केलास त्यावेळी त्यांने सांगितले की, कुटुंबातील वादविवादामुळे मला कंटाळा आला होता. त्याने सांगितले की, घरात खूप वाद होत होते. अगदी लहान मुलंसुद्धा वाद घालत होते. त्यामुळे हेच असं टोकाचं पाऊल उचललं असंही तो म्हणाला. पण त्यानंतर त्याने पोलिसांनी माफी मागितली आणि म्हणाला की, मी तुमच्यासोबत खोटं बोललो आहे. त्यानंतर त्याने एकदाही आपल्या कुटुंबाची त्याने आठवण काढली नाही.
हे ही वाचा >> Crime: माय-लेकाला हाडं मोडेपर्यंत बॅटीनं मारलं, दाम्पत्याने जीवघेणा हल्ला का केला?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT