Badlapur News: आधी पोलिसांवर गोळीबार अन् नंतर अक्षय शिंदेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू

point

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे होता आरोपी

point

अक्षय शिंदेने सर्वात आधी पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा

Badlapur Sexual Assault Case: ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पोलीस व्हॅनमध्ये असताना आरोपी अक्षय शिंदे याने शेजारीच बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून थेट त्यांच्यावरच गोळीबार केला. ज्यानंतर इतर पोलिसांनी स्व-संरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. (badlapur sexual Assault case first the firing on the police and then the death of akshay shinde what really happened)

सुरुवातीला अक्षय शिंदे हा जखमी असून त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

हे ही वाचा>> Akshay Shinde: मोठी बातमी: बदलापूर लैंगिक अत्याचारातील नराधम अक्षय शिंदेनी स्वत:वर झाडल्या गोळ्या!

शिंदे-फडणवीसांनी काय दिली माहिती? 

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला आज (23 सप्टेंबर) दुसऱ्या गुन्ह्याप्रकरणी तळोजावरून  ठाण्यात आणण्यात येत होतं. त्याचवेळी मुंब्रा बायपासजवळ अचानक अक्षय शिंदेने पोलिसाची बंदूक खेचली आणि पोलिसांवर गोळ्या झाडल्या ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला. ज्यानंतर पोलिसांनी स्व-संरक्षणार्थ गोळीबार केला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय? 

बदलापूर येथील एका शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षीय अक्षय शिंदे याने शाळेच्या शौचालयात चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. ज्या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी त्याला अटक केली होती.

हे ही वाचा>> Eknath Shinde : आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

दरम्यान, जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा बदलापूरमधील स्थानिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत थेट रेल रोको केला होता. तब्बल सात तासांहून अधिक काळ हा रेल रोको करण्यात आल्याने या प्रकरणाची प्रशासनाला गंभीर दखल घ्यावी लागली होती. 

ADVERTISEMENT

या घटनेनंतर शिंदे सरकारबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. निदर्शन करणाऱ्या नागरिकांनी आरोपीला आमच्या हवाली करा किंवा आजच्या आज त्याला फाशी द्या अशी मागणी केली जात होती. 

ADVERTISEMENT

दरम्यान, या सगळ्या प्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन करून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

मात्र, आज (23 सप्टेंबर) संध्याकाळच्या सुमारास पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT