Akshay Shinde: मोठी बातमी: बदलापूर लैंगिक अत्याचारातील नराधम अक्षय शिंदेनी स्वत:वर झाडल्या गोळ्या!

मुंबई तक

ADVERTISEMENT

मोठी बातमी: बदलापूर लैंगिक अत्याचारातील नराधम अक्षय शिंदेनी  स्वत:वर झाडल्या गोळ्या!
मोठी बातमी: बदलापूर लैंगिक अत्याचारातील नराधम अक्षय शिंदेनी स्वत:वर झाडल्या गोळ्या!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधम अक्षय शिंदेचा गोळीबार

point

पोलिसांच्या ताब्यात असतानाच अक्षय शिंदेंने बंदूक खेचून केला गोळीबार

point

आरोपी अक्षय शिंदे गंभीर जखमी

बदलापूर: बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेने तुरुंगातच स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय शिंदे याने तुरुंगात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाकडील बंदूक खेचून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक वृत्त समोर आलं आहे. 

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडली आहे.

हे ही वाचा>> Badlapur: नराधम अक्षय शिंदेबद्दल शेजाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती, नेमकं काय सांगितलं?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून तपासासाठी नेले जात होते, ठाण्यातील मुंब्रा बायपास येथे पोहोचल्यानंतर अक्षय शिंदेने पोलीस व्हॅनमध्ये शेजारी बसलेल्या पोलिसाची रिव्हॉल्व्हर खेचून पोलिसांवर आधी गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडली. ज्यामध्ये अक्षय शिंदेच्या मांडीला गोळी लागली. तर प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील अक्षयवर गोळ्या झाडल्या ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अक्षय शिंदे याला कळवा रुग्णालयात आणण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे.

काय होतं बदलापूरमधील नेमकं प्रकरण?

आरोपी अक्षय शिंदे याने बदलापूरमधील एका शाळेतील दोन 4 वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं दोन दिवसांपूर्वी समोर आलं होतं. पण या घटनेची तक्रार घेण्यास बदलापूर पोलिसांनी तब्बल 12 तास लावले होते. ज्यामुळे स्थानिक नागरिकांचा आरोपी आणि पोलिसांविरोधात उद्रेक झाला. सुरुवातीला आंदोलकांनी थेट शाळेत घुसून शाळेची तोडफोड केली. तर त्यानंतर दुसरीकडे बदलापूर स्थानकावरील रेल्वे ट्रॅकवर उतरून तब्बल 9 तास आंदोलन केलं होतं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>>  Badlapur News: 'शिवाजी महाराजांनी आरोपीचे हात काढून घेतलेले', शरद पवारांचा प्रचंड संताप

आरोपीला तात्काळ फाशी द्या ही मागणी करत आंदोलकांनी 9 तास रेल्वे मार्ग रोखून धरला होता. या दरम्यान, अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. अखेर पोलिसांना लाठीहल्ला करत आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हटवलं आणि त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली होती.

ADVERTISEMENT

'अनैसर्गिक सेक्स आणि...', वासनांध अक्षय शिंदेबाबत दुसरी पत्नी काय म्हणाली?

बदलापूर प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आरोपीच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवला होता. ती पालघर जिल्ह्यातील एका गावात राहत असल्याची माहिती आहे. आरोपी अक्षयचं पहिलं लग्न झाल्यानंतर त्याची ही पहिली पत्नी लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात माहेरी निघून गेली होती. अक्षय शारिरीक संबंधावेळी हिंसकपणे वागायचा. त्याची वृत्ती एखादा हैवान किंवा लिंगपिसाटासारखी होती. त्यामुळे लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात ती माहेरी निघून गेली आणि पुन्हा कधीच परतली नाही.

आता पोलिसांनी अक्षय शिंदेविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे, बोईसर पोलिसांनी त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. नंतर हे प्रकरण बदलापूर (पूर्व) पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

आरोपीशी लग्न झाले होते. आरोपी शिंदेने या महिलेला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने तिच्या कुटुंबीयांना आरोपीच्या वागणुकीची माहिती दिली आणि नंतर त्याला सोडून दिले. या प्रकरणी बोईसर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT