अर्ध्या रात्री रिक्षाचालकाने मुलीच्या स्कर्टमध्येच घातला हात, अन्…

ADVERTISEMENT

bengaluru molested girl rapido auto driver putting hand her skirt midnight booking from bar club
bengaluru molested girl rapido auto driver putting hand her skirt midnight booking from bar club
social share
google news

Bengaluru Crime: बेंगळूरुमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलावर्गाला अनेक धक्कादायक अनुभव प्रत्ययास येत आहेत. कारण बेंगळुरूमध्ये एका मुलीने मध्य रात्री रॅपिडो ऑटो (rapido auto) बुक केली होती. रिक्षाचालक मुलीकडे आल्यानंतर त्याने ओटीपीशिवायच तिचा प्रवास सुरु केला. त्यानंतर रिक्षा निर्जनस्थळी गेल्यावर रिक्षाचालकाने (auto driver) मुलीबरोबर छेडछाड केल्याचा प्रकार केला. तिच्या स्कर्टमध्ये हात घालून तो ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने आरडाओरड करताच रिक्षाचालकाने तिला रिक्षातून ढकलून देत पळ काढला. मुलगी रिक्षातून खाली पडल्यामुळे जखमी झाली असून तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना पोलिसात गेल्यानंतर पोलिसांनीही त्याची ओळख पटवून कारवाई सुरु केली आहे.(bengaluru molested girl rapido auto driver putting hand her skirt midnight booking from bar club)

अश्लील हावभाव

बेंगळूरूमध्ये ही घटना घडली आहे 20 नोव्हेंबरच्या मध्यरात्री. ज्या मुलीबाबत हा प्रकार घडला आहे ती मुलगी 22 वर्षाच्या असून ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्या दिवशी ती मुलगी एका बार क्लबमध्ये पार्टी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर तिने उशिरानेच म्हणजेच 2.25 मिनिटाने रॅपिडो ऑटो बुक केली होती. त्या रात्री मुलीला डिफेन्स एन्क्लेव्हमध्ये जायचे होते. रॅपिडो ऑटो बुक केल्यानंतर ऑटोचालक तिथे पोहोचलाही, त्यानंतर मुलीने त्याला ओटीपीही सांगितला. मुलगी रिक्षा बसल्यानंतर त्याने अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलीला जिथे जायचे होते, त्या ठिकाणी तिला घेऊनही जाण्यात आले.

हे ही वाचा >> किळसवाणं! डोसा खाताना निघाले किडे, थेट हाणामारी अन्…

स्कॅन करताना विनयभंग

रिक्षातून उतरून मुलीने रिक्षाचालकाच्या मोबाईलचा क्यूआर कोड स्कॅन करत त्याचे पेमेंट करत होती. त्यावेली रिक्षाचालकाने थेट मुलीच्या स्कर्टमध्ये हात घालून तो ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने अश्लील हावभावही करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिच्याबाबतीत घडल्याने तिने लगेच आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मुलीचा आरडाओरड पाहून त्याने तिथून पळ काढला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रिक्षाचालकाचा लावला शोध

हा घटना घडल्यानंतर मुलीने पोलिसात तक्रारही दाखल केली. त्यावेळी पोलिसांनी सांगितले की, मुलीने केलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातूनच आरोपी रिक्षा चालकाचा शोध लावण्यात आला. या प्रकरणी एकलासुद्दीन लस्कर या रिक्षाचालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर विनयभंग आणि छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा >> Revanth Reddy : तेलंगणात केसी रावांना धोबीपछाड, काँग्रेसचा रोवला झेंडा; कोण आहेत रेड्डी?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT