पहिल्या बायकोला सोडून दुसरीबरोबर थाटला संसार, शेवटी शेतात अर्धनग्न अवस्थेत सापडली बॉडी, कोणी केली हत्या?
एका व्यक्तीचा अर्धनग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख 45 वर्षीय मोहम्मद सोहराब म्हणून झाली आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पहिल्या बायकोला सोडून दुसरीबरोबर थाटला संसार
शेवटी शेतात अर्धनग्न अवस्थेत सापडली बॉडी
कोणी केली हत्या?
Crime News : बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात शनिवारी (18 एप्रिल) एका व्यक्तीचा अर्धनग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख 45 वर्षीय मोहम्मद सोहराब म्हणून झाली आहे. सोहराबचा मृतदेह शेतात अर्धनग्न अवस्थेत पडलेला आढळून आला. स्थानिक शेतकऱ्यांनी सकाळी शेतात जाताना मृतदेह पाहिला आणि आरडाओरडा केला, त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली.
घातपाताची शक्यता
घटनेची माहिती मिळताच भवानीपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजकुमार चौधरी यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पूर्णिया येथे पाठवला आहे. सोहराब गेल्या 12 वर्षांपासून भीखमा देवी नावाच्या महिलेसोबत राहत होता. या घटनेची माहिती मिळताच सोहराबची पहिली पत्नी आणि नातेवाईकही त्या ठिकाणी पोहोचले. मक्याच्या शेतात मृतदेह ज्या अवस्थेत सापडला, त्यावरून घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा : नाशिक पुन्हा हादरले! दारु पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार, 'गजवा-ए-हिंद'चा उल्लेख केल्याचा आरोप
पहिल्या पत्नीचा आरोप काय?
या प्रकरणात सोहराबच्या पहिल्या पत्नीने त्याच्या दुसऱ्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या मते, भीखमा देवीने एका कटांतर्गत सोहराबची हत्या केली आहे. सोहराब क्वचितच आपल्या पहिल्या घरी जात असे आणि तो बहुतेक वेळ दुसऱ्या पत्नीसोबतच राहत होता. दुसरीकडे, भीखमा देवीने हे आरोप फेटाळून लावले असून, सोहराब शुक्रवारी (17 एप्रिल) संध्याकाळी शेताची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले होते पण परतलेच नाहीत, असा दावा तिने केला आहे. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह शेतात मिळाल्याने आपल्याला धक्का बसल्याचे तिने सांगितले.
हे ही वाचा : माहेरी असतानाच नवऱ्याने नर्सची केली हत्या, इंजेक्शन देऊन जीव घेतला, नेमकं कारण काय?
लेखी तक्रार नाही
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गोल्डी यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, याप्रकरणी अद्याप कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही, परंतु पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगवान केला असून लवकरच या घटनेचा खुलासा करण्याचे आश्वासन दिले आहे.









