आईला दिलेला शब्द अपुराच राहिला! नवरा कामावर निघून गेला अन् काही तासांतच...
बिजनौरमध्ये एका विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणी, न्यायालयाने तिचा पती संदीप कुमार याला हत्येचा दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सासू प्रमोद देवी आणि सासरे ब्रिजपाल सिंग यांना प्रत्येकी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. चित्राने तिच्या मृत्यूच्या काही तास आधी तिच्या आईशी संवाद साधला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आईला दिलेला शब्द अपुराच राहिला!
नवरा कामावर निघून गेला अन् काही तासांतच...
Crime News : उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील धामपूर येथे विवाहित महिला चित्रा हिच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने चित्राचा पती संदीप कुमार याला हत्येचा दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर सासू प्रमोद देवी आणि सासरे ब्रिजपाल सिंह यांना प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. याशिवाय तिन्ही दोषींना एकूण 30 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. धामपूर येथील रहिवासी असलेल्या संदीप कुमारसोबत चित्राचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती आणि सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचाल छळ करण्यास व मारहाण करण्यास सुरुवात केली होती.
'आई थोड्या वेळात फोन करतो'
13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी आठ वाजता चित्राने तिच्या आईशी फोनवर संवाद साधला होता. पती ऑफिसला गेल्यानंतर पुन्हा फोन करते, असे तिने आईला सांगितले होते. मात्र, काही तासांतच म्हणजेच सकाळी अकरा वाजता चित्राच्याच मोबाईलवरून तिच्या माहेरी फोन आला. संदीपच्या मावस भावाने फोन करून चित्राचा वीज लागून मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि त्यांना तातडीने बोलावून घेतले. माहिती मिळताच माहेरचे लोक घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना चित्राच्या मृतदेहावर डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत, तसेच हात, पाय आणि गळ्यावर मारहाणीचे आणि रक्ताचे डाग आढळले.
हे ही वाचा : Govt Jobs : खादी व ग्रामोद्योग महामंडळात भरती, काय आहेत पात्रतेचे निकष?
शरीरावरील जखमांवरुन संशय
सुरुवातीला सासरच्या मंडळींनी विजेचा धक्का लागल्याचा दावा केला होता, परंतु शरीरावरील गंभीर जखमा पाहता कुटुंबीयांना हत्येचा संशय आला. चित्राच्या वडिलांनी आरोप केला की, घटनेनंतर सासरच्या लोकांनी पोलिसांना माहिती देण्यास जाणीवपूर्वक उशीर केला आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केला. अखेर वडिलांच्या तक्रारीवरून धामपूर पोलीस ठाण्यात पती संदीप, सासरे ब्रिजपाल आणि सासू प्रमोद देवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये भक्कम पुराव्यांसह दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले.
हे ही वाचा : बीड : लेकीच्या शिक्षणासाठी 'माऊली' अनवाणी धावली, आता भारताच्या उपराष्ट्रपतींचा मोठा निर्णय!
दोन वर्षे चालला खटला
सुमारे दोन वर्षे चाललेल्या या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने चित्राच्या पतीला हत्येसाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड सुनावला, दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल. तसेच सासू-सासऱ्यांना प्रत्येकी दोन वर्षे कारावास आणि दंड ठोठावला. सकाळी 'पुन्हा फोन करते' असे सांगणाऱ्या मुलीच्याच फोनवरून काही तासांत तिच्या मृत्यूची बातमी येणे, या वेदनादायी फोन कॉलच्या स्मृतीसह या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल अखेर समोर आला आहे.
