Badlapur News LIVE: बदलापूरकर उतरले रेल्वे ट्रॅकवर, लोकल ठप्प.. कुठपर्यंत सुरू आहेत ट्रेन?
Central Railway Latest News Update : बदलापूरमध्ये आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटनेमुळं आंदोलनाचा भडका उडाला आहे. संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करत प्रशासनालाही धारेवर धरलं आहे. लोकांनी बदलापूर स्थानकात रेलरोको केल्यामुळं त्याचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
रेलरोको आंदोलनामुळं प्रवाशांची झाली गैरसोय
बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं होतं?
बदलापूरच्या आंदोलनाला हिंसक वळण
Central Railway Latest News Update : बदलापूरमध्ये आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटनेमुळं आंदोलनाचा भडका उडाला आहे. संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करत प्रशासनालाही धारेवर धरलं आहे. लोकांनी बदलापूर स्थानकात रेलरोको केल्यामुळं त्याचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे. नागरिकांनी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात रेलरोको आंदोलन केलं आणि प्रशासनाला धारेवर धरलं. (In Badlapur, the incident of sexual harassment of two minor girls in Adarsh Vidyalaya has sparked a protest. As people have stopped trains at Badlapur station, it has directly affected the traffic of Central Railway)
ADVERTISEMENT
जवळपास सहा तासांपासून रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा थेट परिणाम मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांवरही झाला आहे. कर्जत ते बदलापूर आणि बदलापूर ते अंबरनाथ रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झालीय. बदलापूर हे रेल्वेस्थानक मुंबई-पुणे रेल्वेमार्गाच्या मध्यभागी असल्याने रेल्वेगाड्यांचे अप-डाऊनच्या फेऱ्या बंद झाल्या आहेत.
रेलरोको आंदोलनामुळं प्रवाशांची झाली गैरसोय
मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांची गैरसोय झाली आहे. बदलापूर स्थानकातच संतप्त नागरिकांनी ठिय्या मांडला आहे. पोलीस लोकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आंदोलन चिघळल्यानं जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्याची माहिती समोर आलीय. तसच आंदोलकांनी या अत्याचाराच्या घटनेवरून आक्रमक पवित्रा घेत शाळेची तोडफोडली केली आहे.
हे वाचलं का?
या गाड्या धावणार पनवेल-कर्जत मार्गे, रेल्वे प्रशासनाने दिली ट्वीटरवर माहती
हे ही वाचा >> Badlapur Thane School case: 'शाळाही भाजपच्या लोकांशी संबंधित...', बदलापूर प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं होतं?
शाळेतील कर्मचाऱ्याने १२ आणि १३ ऑगस्टला ३ आणि ४ वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या चिमुकलीनं शाळेत जाण्यास नकार दिला. त्यानंतर पालकांना या संपूर्ण प्रकाराबाबत समजलं.१६ ऑगस्टला संतप्त पालक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले. परंतु, पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. १२ तासांचा कालावधी उलटल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. त्यानंतर स्थानिक राजकीय नेत्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि पोलिसांवर दबाव टाकला.
हे ही वाचा >> Badlapur Crime: बदलापूर अत्याचाराच्या घटनेची INSIDE स्टोरी, 'असा' होता संपूर्ण घटनाक्रम
त्यानंतर उशिरा रात्री पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. १७ ऑगस्टला आरोपीला अटक करुन तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शाळेतील सीसीटीव्ही खराब असल्याची माहिती शालेय प्रशासनाने पोलीस आणि पालकांना दिली. त्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आणि या प्रकरणी संशय अधिक बळावला.१९ ऑगस्टला बदलापूरच्या नागरिकांनी एक बैठक बोलावली. शालेय प्रशासनावर तातडीनं कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आणि २० तारखेला बदलापूर बंदची हाक दिली. या प्रकरणी महिला अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. शाळेतील काही कर्मचाऱ्यांनाही निलंबीत केलं गेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT