Sindhudurg Crime : विदेशी महिलेला जंगलात साखळदंडाने बांधून...सिंधुदुर्गात काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 Chaining a foreign woman in the forest ronapal sindhudurga sawantwadi story
जंगलात एका विदेशी महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विदेशी महिलेला जंगलात साखळदंडाने बांधले

point

गुराख्यामुळे ही घटना उघडकीस आली

point

सावंतवाडी पोलिसांनी महिलेची साखळदंडातून सूटका केली

Sindhudurg Crime News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रोणापाल - सोनुर्ली येथील जंगलात एका विदेशी महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जंगलात गुरे चरायला आलेल्या गुराख्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आता या विदेशी महिलेची साखळदंडातून सूटका करून तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. तसेच विदेशी महिलेसोबत हे कृत्य कुणी केले आहे? याचा तपास पोलीस करीत आहे. (Chaining a foreign woman in the forest ronapal sindhudurga sawantwadi story) 

ADVERTISEMENT

रोनापल येथील जंगलात शनिवारी सकाळी एक गुराखी गुरे घेऊन निघाला होता. जंगलात पोहोचताच एका महिलेचा ओरडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत गुराखी महिलेपर्यंत पोहोचला. यावेळी त्याला एक महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत सापडली होती. त्यानंतर गुराख्याने तत्काळ ग्रामस्थांना यांची माहिती दिली. आणि पोलिसांना देखील या घटनेबाबत कल्पना दिली.

हे ही वाचा : Anil Deshmukh : ''फडणवीसांनी पाठवलं नव्हतं, तर देशमुखांनीच मला...'', समित कदमांचा मोठा खुलासा

 सावंतवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन महिलेची साखळदंडातून सूटका केली होती. त्यानंतर उपचारासाठी तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर अधिकच्या उपचारासाठी तिला ओरोस यैथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. सध्या तिची प्रकृती सुधारत आहे. परंतु अद्याप पर्यंत ती काही बोलू शकत नसल्यामुळे पुढील तपास करण्यासाठी अडचणी येत आहेत. 

हे वाचलं का?

संबंधित महिलेचे नाव ललिता कायी कुमार एस असून ती तामिळनाडूमधील रहिवासी आहे. ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याचे देखील समजते. तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आले होते. मुसळधार पाऊस आणि काही दिवस  उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती, अशी माहिती आहे. 

दरम्यान या संदर्भात सावंतवाडी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा तपास बांदा हद्दीत येत असल्याने बांदा पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती दिली. दरम्यान बांदा पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी जंगलात अधिक तपासासाठी आपण गेलो असल्याचे सांगितले. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ajit Pawar : ''अजित दादांसारख्या व्यक्तीमत्वाला तोंड लपवून...'', ठाकरेंच्या नेत्याची बोचरी टीका

 सदर महिला ही परदेशी नागरिक असल्याने पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार त्या महिलेचे पतीशी भांडण झाल्याने हा पतीकडून प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रत्यक्षात अधिक माहिती समोर आली नाही. अद्यापही कोणत्या प्रकारची तक्रार दाखल झाली नसून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलीस अतिशय सावधगिरीने या केसचा तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT